Success Story: ‘या’ कुटुंबात आहेत तब्बल ११ आयएएस-आयपीएस अधिकारी, जाणून घ्या त्यांच्या यशाबाबत

Success Story: हरियाणात राहणारे चौधरी वसंत सिंह श्योंकद यांनी आपल्या कुटुंबात असा रेकॉर्ड बनवलाय. ज्याबाबत ऐकून आपल्या सर्वांना त्यांचा आदर वाटेल. त्यांच्या कुटुंबातील तब्बल ११ सदस्य हे अधिकारी पदावर आहेत.

In this Family 11 IAS-IPS officer
‘या’ कुटुंबात आहेत तब्बल ११ IAS-IPS अधिकारी, जाणून घ्या  

थोडं पण कामाचं

  • चौधरी वसंत यांनी आपल्या कुटुंबातील सर्व मुलांना बनवलं ग्रेड वन ऑफिसर
  • मुलं-सूना, नात-नातू सर्व जण आहेत ग्रेड वन ऑफिसर
  • वयाच्या ९९ व्या वर्षी चौधरी वसंत सिंह यांचं निधन

चंदीगढ: हरियाणातील राहणारे चौधरी वसंत सिंह श्योंकद यांनी आपल्या कुटुंबाचा एक असा पाया रचला आहे की, घरातील प्रत्येक व्यक्ती अधिकारी बनलीय. स्वत: त्यांचं शिक्षण चवथीपर्यंत झालंय, मात्र त्यांनी आपल्या मुलांना नेहमी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांच्या परिश्रमानं सर्व काही बदललं. मात्र ९९व्या वर्षी त्यांचं निधन झालं, मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाला असं आदर्श कुटुंब बनवलं की, तिथं नोकरी करणारा प्रत्येक जण ग्रेड वन ऑफिसर आहे.

११ ग्रेड वन ऑफिसरचं आहे हे कुटुंब

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील डूमरखा कलां या गावात राहणारे चौधरी वसंत सिंह श्योंकद यांच्या कुटुंबात २ आयएएस, १ आयपीएस यांच्यासह ग्रेड वन क्लासचे तब्बल ११ अधिकारी आहेत. वसंत सिंह यांचं उठणं-बसणं नेहमी ग्रेड वन ऑफिसर सोबत राहिलं होतं आणि हेच कारण आहे की, त्यांना आपल्या मुलांना ग्रेड वन ऑफिसर बनवायचं होतं. त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात सर्वांना ग्रेड वन ऑफिसर बनवलं आहे.

९९ वर्षांच्या वयात झालं निधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौधरी वसंत सिंह श्योंकद स्वत: चवथ्या वर्गापर्यंत शिकू शकले होते. आता ते नाहीयेत, त्यांचं वयाच्या ९९व्या वर्षाच्या वयात निधन झालं. पण त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना यशस्वी बनवलं, ते खूप खास आहेत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्या यशाचं श्रेय त्यांनाच देतात.

या अधिकाऱ्यांनी भरलंय घर

चौधरी वसंत सिंह यांचे मुलं, मुली, सून आणि नात ग्रेड वन ऑफिसर आहे. त्यांचे चारही मुलं क्लास वन अधिकारी आहे, तर सून आणि नातू-नात आयएएस अधिकारी आहेत. तर त्यांची एक नात आयआरएस अधिकारी आहे. वसंत सिंह यांचा मोठा मुलगा रामकुमार श्योकंद निवृत्त प्रोफेसर आहेत त्यांचा मुलगा यशेंद्र आयएएस अधिकारी आणि मुलगी स्मिती चौधरी अंबाला इथं रेल्वे एसपी म्हणून काम करतात. स्मिती यांचे पती बीएसएफमध्ये आयजी आहे. तर चौधरी वसंत यांचा दुसरा मुलगा कॉन्फेडमध्ये जीएम होते आणि त्यांची पत्नी डेप्युटी डीईओ राहिलेल्या आहेत. मुलगा-सून, नात-नातू प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या ग्रेड वन पोस्टवर तैनात आहेत. तिसरा मुलगा वीरेंद्र एसई होते. त्यांची पत्नी इंडियन एअरलाईन्समध्ये डेप्युटी मॅनेजर होत्या. वसंत सिंह यांचा चवथ्या मुलाचं नाव गजेंद्र सिंह आहे. ते भारतीय सैन्यात कर्नल पदावरून निवृत्त झाले. सध्या ते खाजगी पायलट म्हणून काम करत आहेत.

सर्वांनी एकमेकांना यश मिळवून देण्यासाठी त्यांची जबाबदारी उचलली

घरात प्रत्येक व्यक्तीनं एकमेकांच्या यशाची जबाबदारी घेतली. चौधरी वसंत यांनी आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना आपल्या भावा-बहिणीला आणि मुलांना पुढे नेलं. एव्हढंच नव्हे तर त्यांनी जिंद इथं हुशार विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना दत्तक घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. सध्या दत्तक घेतलेले दोघं कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. चौधरी वसंत सिंह मूळात शेती करत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी