INX Media Case: पी चिदंबरम यांची तिहारमध्ये दोन तास चौकशी, ईडीकडून अटक 

INX Media Case ED enquiry: आयएनएक्स मीडिया प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करत असलेल्या ईडीच्या टीमनं चिदंबरम यांना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाची टीम त्यांची चौकशी करण्यासाठी तिहार कारागृहात पोहोचली.

P. Chidambaram
INX Media Case: पी चिदंबरम यांची तिहारमध्ये दोन तास चौकशी, ईडीकडून अटक   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • आयएनएक्स मीडिया (INX Media) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना ईडीनं अटक केली आहे.
  • एका विशेष न्यायालयानं मंगळवारी ईडीच्या 3 अधिकाऱ्यांना आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
  • चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम आणि त्यांची पत्नी नलिनी चिदंबरम सुद्धा बुधवारी तिहार कारागृहात पोहोचले. 

नवी दिल्लीः  आयएनएक्स मीडिया (INX Media) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना ईडीनं अटक केली आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांची टीम आज तिहार कारागृहात पोहोचली होती. एका विशेष न्यायालयानं मंगळवारी ईडीच्या 3 अधिकाऱ्यांना आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती. चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम आणि त्यांची पत्नी नलिनी चिदंबरम सुद्धा बुधवारी तिहार कारागृहात पोहोचले. 

आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांच्या विरोधात सीबीआय चौकशी करत असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्याचा कालावझी उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबरला संपणार आहे. या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. 21 ऑगस्टला सीबीआयनं त्यांना अटक केला होती. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ते तुरूंगात आहेत. या प्रकरणात ईडीनं चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी स्थानिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ज्याला न्यायालयानं परवानगी दिली. 

न्यायालयानं मंगळवारी म्हटलं होतं की, ईडीचे अधिकारी बुधवारी सकाळी 8.30 वाजल्यानंतर त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. न्यायालयानं हे देखील स्पष्ट केलं होतं, गरज पडल्यास ते अटक देखील करू शकतात. दरम्यान, वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडत फिर्यादींना दिलेला युक्तिवाद फेटाळून लावला की, तुरुंगातून सोडल्यास ते परदेशात जाण्याची भीती बाळगतात आणि त्यांची नजर अनावश्यक असल्याचे म्हटले आहे.

चिदंबरम यांची जामीन याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यानंतर त्यांच्याकडून मंगळवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि म्हटलं की, त्याचा 'अपमान' केल्यामुळे चौकशी कारागृहात त्याला तुरूंगात टाकायचे आहे.

अर्जेंटिनात संपत्ती?

कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती भामुमती यांच्या कोर्टापुढे प्रकरण लिस्ट करण्याची विनंती केली. पण, न्यायाधीश भानुमती यांनी सरन्यायाधीशांच्या आदेशाशिवाय प्रकरण लिस्ट होणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने सुप्रीम कोर्टात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार चिदंबरम यांच्यासह इतर संशयितांची अर्जेंटिनासह इतर देशांमध्ये कोट्यवधीची संपत्ती आहे. याप्रकरणात अजून माहिती मिळत असल्यामुळे प्रकरणी अद्याप लिस्ट झालेले नाही. संचालनालयाने चिदंबरम यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचे सांगितले आहे. 

त्यामुळेच चिदंबरम यांना दिलासा दिला जाऊ नये, असे संचालनालयाचे म्हणणे आहे. आयएनएक्स मीडियाप्रकरणात नाट्यमय घडामोडींनंतर चिदंबरम यांना त्यांच्या जोरबागमधील निवासस्थानी अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानाचे गेट आणि कम्पाऊंडच्यावरून आत जावे लागले होते. त्यांना २१ ऑगस्ट रोजी कोर्टात दाखल करण्यात आल्यानंतरच त्यांची सीबीआयच्या कोठडीत रवानगी करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी