Iran cyberattack | इराणमध्ये सायबर हल्ल्यामुळे गॅस स्टेशनचे काम ठप्प...अमेरिका आणि इस्त्रायलने केल्याचा आरोप

Iran cyberattack | इराणमध्येदेखील इंधनाचे दर वाढले आहेत. इराणच्या म्हणण्यानुसार सायबर हल्ले किंवा ऑनलाइन हल्ले यासंदर्भात हायअलर्ट देण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने हा सायबर हल्ला केल्याचा आरोप इराणने केला आहे.

Iran cyberattack
इराणवर सायबर हल्ला 
थोडं पण कामाचं
  • इराणमधील गॅसोलिन स्टेशनवर सायबर हल्ला झाल्याचा इराणचा आरोप
  • सब्सिडी देणाऱ्या गॅसोलिन स्टेशन ठप्प झाल्याने मोठ्या रांगा
  • इराणचा अमेरिका आणि इस्त्रायलवर निशाणा

Iran cyberattack | तेहरान: सायबर हल्ला (cyberattack)झाल्यामुळे सब्सिडीच्या रुपात मिळणाऱ्या गॅसोलिनची विक्री खंडित झाल्याचे इराणकडून (Iran)सांगण्यात आले आहे. यामुळे इराणमधील गॅस स्टेशनवर (gas stations in Iran) लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इराणमध्येदेखील इंधनाचे दर वाढले आहेत. इराणच्या म्हणण्यानुसार सायबर हल्ले किंवा ऑनलाइन हल्ले यासंदर्भात हायअलर्ट देण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने हा सायबर हल्ला केल्याचा आरोप इराणने केला आहे. तर अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी इराणवर आरोप केला आहे की इराणकडून त्यांच्या देशातील नेटवर्कवर हल्ला केला जातो आहे. (Iran says cyberattack disrupted gas stations in country)

इराणमधील गॅस स्टेशन ठप्प

इराणमधील गॅस स्टेशनवरील रिफ्युएलिंग सिस्टम ठप्प झाल्या आहेत. यामागे देशाच्या गॅसोलिन स्टेशनवर झालेला सायबर हल्ला आहे. तंत्रज्ञ आणि जाणकार हा संकटातून मार्ग काढत आहेत आणि लवकरच गॅस स्टेशनवरील कामकाज सुरळीत होईल असे इराणकडून सांगण्यात आले आहे. इराणच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले की स्मार्ट कार्ड्सचा वापर करून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या स्वस्त गॅसोलिनचा पुरवठाच फक्त खंडित झाला आहे. ग्राहक महागड्या दराने इंधन खरेदी करू शकतात. हा हल्ला परदेशातून झाला आहे. मात्र लगेचच एखाद्या देशाचे नाव घेणे योग्य ठरणार नाही, असे मत इराणच्या कौन्सिल ऑफ सायबरस्पेसचे सचिव अबोलहसन फिरोझाबादी यांनी म्हटले आहे.

गॅसोलिन स्टेशन लवकरच सुरळीत होणार

नोव्हेंबर २०१९मध्ये वाढलेल्या इंधनाच्या दरांच्या घटनेला दुसरे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला आहे. त्यावेळेस इंधन दरवाढीच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले होते आणि शेकडो नागरिक सुरक्षा दलांकडून मारले गेल्याचेही वृत्त त्यावेळेस समोर आले होते. सोशल मीडियावर आजचा हल्ला आणि दोन वर्षापूर्वीचा प्रसंग यासंदर्भात अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. जवळपास अर्धा डझन गॅसोलिन स्टेशन तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती केल्याने सुरू झाले आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनुसार इंधनाचा तुटवडा भासणार नाही आणि उर्वरित गॅसोलिन स्टेशनदेखील लवकरच सुरू केले जातील.

२०१० मध्ये इराणवर मोठा सायबर हल्ला

याआधीही भूतकाळात इराणवर सायबर हल्ला करण्यात आला होता. जुलै महिन्यातच दळणवळण मंत्रालयाची वेबसाईट सायबर हल्ला करून बंद पाडण्यात आली होती. जुलैमध्येच रेल्वे सेवा सायबर हल्ल्याद्वारे विलंबित करण्यात आली होती. इराणच्या युरेनियम शुद्धीकरण प्रकल्पावर अमेरिकेने आणि इस्त्रायलने सायबरहल्ला केल्यानंतर २०१० मध्ये स्टक्सनेट हा व्हायरस शोधण्यात आला होता. एखाद्या उद्योगावर किंवा संस्थेवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या व्हायरसबद्दल पहिल्यांदाच सार्वत्रिकरित्या बोलण्यात आले होते.

इराणमध्ये नैसर्गिक वायू, कच्चे तेल याचे मोठे साठे आहेत. इराण हा जगातील महत्त्वाचा निर्यातदार देश आहे. मात्र अमेरिकेने निर्बंध लादल्यामुळे इराणच्या निर्यातीवर आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी