इराणकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 29, 2020 | 19:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने हा वॉरंट जनरल कासिम सुलेमानी मृत्यू प्रकरणात ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. 

donald trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अटक वॉरंट 

थोडं पण कामाचं

  • इराणने हा वॉरंट जनरल कासिम सुलेमानी मृत्यू प्रकरणात ट्रम्प विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.
  • तेहरानचे अभियोक्ता अली अल कासिमेहर यांच्या हवाल्याने वृत्त एजन्सी आयएसएनएने सांगितले की अरेस्ट वॉरंटमध्ये ट्रम्पशिवाय आणखी ३० जणांची नावे आहेत.
  • ट्रम्प यांच्याविरोधात भले इराणने अरेस्ट वॉरंट जारी केला असला तरी वृत्त एजन्सी असोसिएट प्रेसच्या मते त्याना अटकेची कोणतीही भीती नाही. 

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पविरोधात(donald trump) इराणने(iran) अरेस्ट वॉरंट(arrest warrant) जारी केला आहे. Ruadaw English च्या नुसार इराणने यासोबतच इंटरपोल मुख्यालयाकडून याबाबत मदत मागितली आहे. तेहरानकडून इंटरपोलला फोन करून सांगण्यात आले की अमेरिकेचे राष्ट्रपती आणि या प्रकरणातील अन्य लोकांना ताब्यात घेण्यात त्यांची मदत करावी. 

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने हा वॉरंट जनरल कासिम सुलेमानी मृत्यू प्रकरणात ट्रम्प विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला बगदाद इंटरनॅशनल एअरपोर्टजवळील ड्रोन हल्ल्यात इराणचे टॉप जनरल कासिम सुलेमानी मारले गेले होते. ट्रम्प यांच्याविरोधात भले इराणने अरेस्ट वॉरंट जारी केला असला तरी वृत्त एजन्सी असोसिएट प्रेसच्या मते त्याना अटकेची कोणतीही भीती नाही. 

तेहरानचे अभियोक्ता अली अल कासिमेहर यांच्या हवाल्याने वृत्त एजन्सी आयएसएनएने सांगितले की अरेस्ट वॉरंटमध्ये ट्रम्पशिवाय आणखी ३० जणांची नावे आहेत. इराणच्या मते हे सर्व लोक ३ जानेवारीला त्यांच्याकडे केलेल्या ड्रोन स्ट्राईक प्रकरणात संलिप्त आहेत. यात जनरस सुलेमानी मारले गेले होते. ज्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे त्यांच्यावर हत्या आणि दहशतवादास प्रोत्साहन देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. निम-सरकारी संवाद एजन्सी आयएसएनच्या वृत्तानुसार अलकासीमरने ट्रम्पशिवाय अन्य कोणाचीही ओळख पटवली नाही. 

इंटरपोलला रेड नोटीस जारी करण्याची अपील

तेहरानचे प्रोसिक्युटर अली अलकसिमेरने म्हटलंय की, इराणने ट्रम्प आणि बाकी आरोपींसाठी इंटरपोलची उच्चस्तरीय रेड नोटीस जारी करण्याची अपील केली आहे. ज्यामुळे या लोकांचे लोकेशन शोधून त्यांना अटक केली जाईल. सध्या असं मानलं जात आहे की इंटरपोल असे काही करणार नाही. यात निर्देश देण्यात आले आहेत की राजकीय कारवायांमध्ये इंटरपोल सहभागी होऊ शकत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी