IRCTC/Indian Railways: रेल्वेने २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यानच्या 'या' गाड्या केल्या रद्द

irctc indian railways northern railway cancels trains from 24 to 27 november 2021 रेल्वेने २४ नोव्हेंबर २०२१ ते २७ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत धावणार असलेल्या निवडक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक कारणामुळे गाड्या रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

irctc indian railways northern railway cancels trains from 24 to 27 november 2021
IRCTC/Indian Railways: रेल्वेने २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यानच्या 'या' गाड्या केल्या रद्द  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • IRCTC/Indian Railways: रेल्वेने २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यानच्या 'या' गाड्या केल्या रद्द
 • तांत्रिक कारणामुळे गाड्या रद्द
 • प्रवाशांनी बदलांची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे

irctc indian railways northern railway cancels trains from 24 to 27 november 2021 नवी दिल्ली: प्रवासी कृपया लक्ष द्या. रेल्वेने २४ नोव्हेंबर २०२१ ते २७ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत धावणार असलेल्या निवडक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक कारणामुळे गाड्या रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी बदलांची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. ज्या गाड्या रद्द केल्या आहेत त्या गाडीतून प्रवास करण्यासाठी तिकीट खरेदी केले असेल तर नियमानुसार परतावा दिला जाईल.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद स्टेशनवर तिसऱ्या फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. या कामामुळे नॉर्दन रेल्वे अर्थात उत्तर रेल्वे विभागाने नऊ गाड्या रद्द केल्या आहेत आणि काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. नॉर्दन रेल्वे अर्थात उत्तर रेल्वे विभागाने ट्वीट करुन वेळापत्रकातील बदलांची माहिती दिली आहे. 

रद्द केलेल्या गाड्या

 1. 04183/04184 टूंडला-दिल्ली जं.-टूंडला एईएमयू विशेष २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत रद्द
 2. 04444/04443 नवी दिल्ली-गाझियाबाद-नवी दिल्ली विशेष २४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत रद्द
 3. 04439 पलवल-नवी दिल्ली-गाझियाबाद विशेष २४ आणि २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रद्द
 4. 04459/04460 दिल्ली जं.-सहारनपुर-दिल्ली जं. एमईएमयू विशेष २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रद्द
 5. 04335/04336 मुरादाबाद-गाजियाबाद-मुरादाबाद विशेष २६ नोव्हेंबर २०२१ रोजी रद्द

अंशतः रद्द केलेल्या गाड्या

 1. 04407 पलवल-गाझियाबाद ईएमयू विशेष २४ ते २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अंशतः रद्द
 2. 04409 गाझियाबाद-शकूरबस्ती ईएमयू विशेष २४ ते २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अंशतः रद्द
 3. 04419 मथुरा जं-गाझियाबाद ईएमयू विशेष २४ ते २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अंशतः रद्द
 4. 04420 गाझियाबाद-मथुरा जं. ईएमयू विशेष २४ ते २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अंशतः रद्द

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी