IRCTC Trains Cancelled List, 14 July: मुसळधार पाऊस, पुरामुळे अनेक ट्रेन रद्द, पाहा यादी

IRCTC Railway Train Cancelled List Today, 14 July 2022: अतिवृष्टी, पूर आणि इतर कारणांमुळे आज अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी, रद्द केलेल्या गाड्यांची संपूर्ण यादी येथे पाहा.

IRCTC Trains Cancelled List, 14 July: मुसळधार पाऊस, पूरामुळे अनेक ट्रेन रद्द, पाहा यादी
मुसळधार पाऊस, पुरामुळे अनेक ट्रेन रद्द, पाहा यादी 
थोडं पण कामाचं
  • मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
  • सततच्या पर्जन्यवृष्टीमुे रेल्वे सेवेवर परिणाम
  • अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन्स रद्द

IRCTC Railway Train Cancelled List Today, 14 July 2022: मुंबई: मुसळधार पाऊस आणि पुरामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. ज्याचा परिणाम वाहतुकीच्या साधनांवर झाला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आजही भारतीय रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. हे लक्षात घ्यावे की देशात दररोज मोठ्या संख्येने लोक ट्रेनमधून प्रवास करतात. अशा परिस्थितीत, प्रवासासाठी घर सोडण्यापूर्वी जाणून घ्या की आज तुमची ट्रेन रद्द किंवा वळविण्यात तर आलेली नाही ना?

ही माहिती भारतीय रेल्वे दररोज शेअर करत असते.   https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाईट किंवा NTES अॅप द्वारे आपण रेल्वेचं स्टेट्स पाहू शकता. 

अधिक वाचा: Mumbai Rain Update: मुंबईत आजही मुसळधार पाऊस कायम, गरज असेल तरच घराबाहेर पडा; वाचा शहरातल्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

आज रद्द झालेल्या किंवा मार्ग बदलेल्या रेल्वे गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 181 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, 05 ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. तर 11 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. ही यादी रेल्वेकडून सतत अपडेट केली जाते आणि अशा परिस्थितीत रद्द केलेल्या, वळवलेल्या आणि रिशेड्युल गाड्यांची संख्याही वाढू शकते. 

अधिक वाचा: राज्यभर पावसाची दाणादाण, 'या' ठिकाणी रेड अलर्ट जारी

त्यामुळे या संदर्भातील अपडेटेड माहिती वेबसाइटवरून मिळणे महत्त्वाचे आहे. आता वेबसाइटवरून ते कसे तपासायचे हा तुमचा प्रश्न असेल, तर काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमच्या ट्रेनबाबत माहिती मिळवू शकता.

 रद्द झालेल्या ट्रेनची यादी अशी तपासा-

  1. सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जा.
  2. स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या पॅनलवर तुम्हाला Exceptional Trains लिहिलेले दिसेल. इथे क्लिक करा.
  3. यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय असतील, त्यापैकी रद्द झालेल्या ट्रेन्सचा (Cancelled Trains) पर्याय असेल, जर तुम्हाला रद्द झालेल्या गाड्यांची यादी पहायची असेल, तर त्यावर क्लिक करा.
  4. गाड्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी, पूर्ण (Fully) किंवा आंशिक (Partially)  पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा. या क्रमात, तारीख निश्चित करा, तुम्ही रद्द केलेल्या गाड्या शोधत आहात ती तारीख वेबसाइटवर लिहिलेली आहे की नाही याची खात्री करा.
  5. त्याच प्रक्रियेचा अवलंब करून, तुम्ही रिशेड्यूल केलेल्या आणि वळवलेल्या ट्रेनची यादी देखील तपासू शकता आणि तुम्हाला प्रवास करायचा आहे ती ट्रेन रद्द, वळवलेली किंवा पुन्हा शेड्यूल केलेली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.
  6. हे लक्षात घ्या की, ही यादी रेल्वेकडून सतत अपडेट केली जाते. आणि अशा परिस्थितीत रद्द, वळवलेल्या आणि रिशेड्युल गाड्यांची संख्या देखील वाढू शकते. त्यामुळे या संदर्भातील अपडेटेड माहिती पाहणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी