Syria Earthquake : भूकंपाचा गैरफायदा घेऊन जेलमधून पळाले IS चे दहशतवादी

is terrorist escape from syrian prison after the earthquake : तुर्कस्तान आणि सीरिया या 2 देशांमध्ये सोमवार 6 फेब्रुवारी 2023 रोजी भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत जवळपास 5 हजार मृत्यू झाले आहेत. पण कैद्यांना फायदा झाला. 

is terrorist escape from syrian prison after the earthquake
भूकंपाचा गैरफायदा घेऊन जेलमधून पळाले IS चे दहशतवादी 
थोडं पण कामाचं
  • भूकंपाचा गैरफायदा घेऊन जेलमधून पळाले IS चे दहशतवादी
  • सीरियातील ज्या भागात भूकंप झाला तिथल्या जेलच्या इमारतीची पडझड झाली
  • भूकंपाचा कैद्यांना फायदा झाला

is terrorist escape from syrian prison after the earthquake : तुर्कस्तान आणि सीरिया या 2 देशांमध्ये सोमवार 6 फेब्रुवारी 2023 रोजी भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत जवळपास 5 हजार मृत्यू झाले आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. भूकंपामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. लाखो नागरिक बेघर झाले. अनेक कुटुंबांची वाताहात झाली. पण कैद्यांना फायदा झाला. 

सीरियातील ज्या भागात भूकंप झाला तिथल्या जेलच्या इमारतीची पडझड झाली. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कैदी जेलमधून पळून गेले. धक्कादायक म्हणजे पळालेल्या कैद्यांमध्ये आयएसचे धोकादायक दहशतवादी पण आहेत. भूकंपानंतर सीरियाच्या जेलमधून आयएसचे किमान 20 धोकादायक दहशतवादी पळून गेल्याचे अधिकृत वृत्त आले आहे. 

सीरियातील राजो शहरात लष्करी पोलिसांचे जेल आहे. या जेलमध्ये 2 हजारपेक्षा जास्त कैदी होते. जेलमधील कैद्यांमध्ये 1300 पेक्षा जास्त कैदी हे दहशतवादी होते. पण भूकंपामुळे जेलच्या इमारतीची पडझड झाली. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कैदी जेलमधून पळून गेले. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये आयएसचे किमान 20 धोकादायक दहशतवादी असल्याचे वृत्त आहे.

सीरिया सरकारने कैदी पळून गेल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण राजो या शहरामध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स वॉर मॉनिटर या स्वयंसेवी संस्थेने जेलमध्ये कैद्यांनी बंड केल्याचे सांगितले. यानंतर परिस्थिती चिंताजनक झाल्याची माहिती दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी