ISI एजंटला पळवून-पळवून मारलं; डी गँगच्या म्होरक्याचा खात्मा, LIVE VIDEO आला समोर

ISI agent shot dead: आरोपी लाल मोहम्मद हा पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतीय चलनातील नकली नोटा नेपाळमध्ये मागवत होता. त्यानंतर त्या नकली नोटा भारतीय बाजारात वितरीत करत होता. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: @Pixabay) 
थोडं पण कामाचं
  • लाल मोहम्मद याला वाचवण्यासाठी मुलीने छतावरुन घेतली उडी
  • मुलीने उडी मारण्यापूर्वीच लाल मोहम्मद याला गोळ्या झाडून ठार करण्यात आले होते
  • नेपाळमध्ये आयएसआयचा हा एजंट भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करत होता

ISI Agent Lal mohammad killed: भारताच्या विरोधात कारवाया करणारा लाल मोहम्मद याचा खात्मा करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी लाल मोहम्मद याला पळवून पळवून मारलं. लाल मोहम्मद हा नेपाळमध्ये राहत होता आणि तेथेच त्याला ठार करण्यात आलं. लाल मोहम्मद सातत्त्याने भारताच्या विरोधात कारवाया करत होता. (isi agent lal mohammad shot dead in nepal live video goes viral)

पळवून पळवून केलं ठार

लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी हा नेपाळमध्ये राहत होता. 19 सप्टेंबर रोजी लाल मोहम्मद आपल्या घरी पोहोचला त्यावेळी तेथे लपून बसलेले हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर आपल्यावर हल्ला करणार हे लक्षात येताच लाल मोहम्मद याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ठार केलं.

हे पण वाचा : 'या' टिप्सने एका झटक्यात प्रेम विवाहाला मिळेल होकार

मुलीची बचावासाठी छतावरुन उडी

लाल मोहम्मद याच्यावर जेव्हा गोळ्या झाडण्यात येत होता तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकून त्याच्या मुलीने छतावरुन उडी घेततली. वडिलांवर हल्ला होत असल्याचं लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी तिने छतावरुन उडी मारली. मात्र, जोपर्यंत ती घटनास्थळी पोहोचेल तोपर्यंत हल्लेखोरांनी लाल मोहम्मद याचा खात्मा केलेला होता.

हे पण वाचा : चाळीशीनंतर Chitrangada Singh दिसतेय कमालीची हॉट, पहा Pics

लाल मोहम्मद भारताच्या विरोधात अनेक कारवाया करत होता. आयएसआयसाठी तो काम करत होता इतकेच नाही तर डी गँगच्या कारवाया करण्यासाठी णदत करायचा. तसेच भारतात नकली नोटा सप्लाय करण्यासाठी काम करत होता. नेपाळमधून भारतीय चलनातील नोटा तो भारतात सप्लाय करत होता. नकली नोटांचा सप्लाय करण्यात लाल मोहम्मद हा महत्त्वाची भूमिक बजावत होता.

लाल मोहम्मद याला नेपाळमध्ये एका हत्येच्या प्रकरणात शिक्षाही झाली होती. या प्रकरणात तो जेलमधून नुकताच सुटून बाहेर आला होता. त्याने नकली नोटांचा सौदागर असलेल्याची हत्या केली होती आणि या हत्या प्रकरणातच डी कंपनीचा शार्प शूटर मुन्ना खान याच्यासोबत 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी