Mohali Blast: ISI चा पंजाबला परत पेटवण्याचा प्रयत्न, अफगाणिस्तानमध्ये दिले जाते प्रशिक्षण

पंजाबमधील (Punjab) मोहाली (Mohali) येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर (intelligence headquarters) सोमवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यानंतर एकीकडे सुरक्षा यंत्रणा (Security system) त्याची तारं उलगडण्यात गुंतली आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI) भारताविरुद्धचा नवा कट उघड झाला आहे. गुप्तचर कागदपत्रांवरून उघड झाले की, पंजाबला परत एकदा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ISI's attempt to re-ignite Punjab,
Mohali Blast: ISI चा पंजाबला परत पेटवण्याचा प्रयत्न  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पंजाबमधील दहशतवादी घटनांसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने नव्या नावाने दहशतवादी गट तयार केला आहे.
  • नव्या दहशतवादी गटाचे नाव लष्कर-ए-खालसा असे ठेवण्यात आले आहे.
  • अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांचाही लष्कर-ए-खसालामध्ये समावेश करण्यात आला आहे.

ISI's New Conspiracy: पंजाबमधील (Punjab) मोहाली (Mohali) येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर (intelligence headquarters) सोमवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्यानंतर एकीकडे सुरक्षा यंत्रणा (Security system) त्याची तारं उलगडण्यात गुंतली आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI) भारताविरुद्धचा नवा कट उघड झाला आहे. गुप्तचर कागदपत्रांवरून उघड झाले की, पंजाबला परत एकदा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.पंजाबमधील दहशतवादी घटनांसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने नव्या नावाने दहशतवादी गट तयार केला आहे. नव्या दहशतवादी गटाचे नाव लष्कर-ए-खालसा असे ठेवण्यात आले आहे. या दहशतवादी गटात सामील असलेल्या लोकांना अफगाण सैनिकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

आयएसआयची नवी योजना 

अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांचाही लष्कर-ए-खसालामध्ये समावेश करण्यात आला आहे. अफगाण दहशतवाद्यांना आरपीजीसह सर्व आधुनिक शस्त्रे चालवण्याचा अनुभव आहे. या गटाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले घडवून आणण्याचा कट आहे. पंजाब आणि हरियाणातील स्थानिक गुंड आणि गुन्हेगारांचाही या दहशतवादी गटात समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना अमली पदार्थांच्या माध्यमातून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

पंजाबचे डीजीपी व्हीके भवरा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहालीतील स्फोटानंतर लवकरच संपूर्ण प्रकरण उकलण्याचा दावा केला. हे प्रकरण सोडवण्याचा आमचा प्रयत्न असून लवकरच हे प्रकरण सोडवू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की एक projectile अस्त्र वापरले गेले आहे. हल्ल्याच्या वेळी खोलीत कोणीही नव्हते. पण हे आव्हान आहे, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. व्हीके भवरा पुढे म्हणाले की, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही..

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी सांगितले की, मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर युनिटच्या मुख्यालयात झालेल्या स्फोटाची चौकशी सुरू आहे. राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सीएम मान यांनी पोलिस महासंचालकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आणि घटनेचा अहवाल मागवला आहे.

भगवंत मान यांनी पंजाबीमध्ये ट्विट केले की, "पंजाब पोलीस मोहालीतील स्फोटाचा तपास करत आहेत. पंजाबमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.'' दरम्यान मोहाली सेक्टर 77 स्थित पोलीस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयाच्या आवारात सोमवारी रात्री रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला करून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी