Prophet Muhammad Controversy । नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबर वादात एक नवा ट्विस्ट आला आहे. आता इस्लामिक स्टेटनेही याप्रकरणी बुलेटीन जारी केले आहे. या बुलेटिनमध्ये इस्लामिक स्टेटने भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) ने त्यांचे मुखपत्र अल अझीम फाऊंडेशनद्वारे एक न्यूज बुलेटिन सेवा सुरू केली आहे. (Islamic State threatens India over Nupur Sharma controversy, Warned to attack several cities).
अधिक वाचा : मोबाईल फोन झपाट्याने वाढतोय नपुंसकतेची प्रकरणं
या बुलेटिनमध्ये भारत आणि पैगंबर यांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या बुलेटिनमध्ये नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याबाबत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये प्रथम भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालताना पाहायला मिळत आहे. त्या नंतर ISKP आत्मघाती बॉम्बरची भूतकाळातील विधाने समाविष्ट करण्यात आली आहेत ज्यांनी शक्य असेल तेव्हा भारतावर हल्ले करण्याची धमकी दिली होती. न्यूज बुलेटिनमध्ये दहशतवादी संघटनेने पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हिंदूंना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, फगाणिस्तानमधील शिखांवर झालेला हल्लाही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे. ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, "यामध्ये नरेंद्र मोदींचे ॲनिमेशन आणि अफगाणिस्तानमधील शीखांवर झालेल्या हल्ल्यानंतर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. बुलेटिनच्या शेवटी हा मेसेज देण्यात आला आहे की ते लवकरच भारतावर हल्ला करतील.
लक्षणीय बाब म्हणजे याआधी हशतवादी संघटना अल-कायदा (AQIS) ने पैगंबराचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी दिल्ली, मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली होती. ६ जून २०२२ रोजी एका निवेदनात दहशतवादी संघटनेने म्हटले होते की, "भगवा दहशतवाद्यांनी आता दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये त्यांचा अंत होण्याची वाट पाहिली पाहिजे." प्रेषित मुहम्मद यांच्या अपराध्यांना कोणतीही माफी किंवा क्षमा दिली जाणार नाही, कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवू शकणार नाही आणि दु:खाच्या निषेधाच्या कोणत्याही शब्दाने हे प्रकरण बंद केले जाणार नाही."