Israel | बापरे ! इस्त्रायलच्या 'मोसाद'ला मोठा झटका, संरक्षणमंत्र्यांच्या घरापर्यत पोचले इराणचे गुप्तहेर

Spy in Israel's Defence Minister's home | मोसादच्या ताकदीवर आणि क्षमतेवर आक्रमकपणे जगभर दबदबा निर्माण करणाऱ्या इस्त्रायलला इराणने मोठा झटका दिला आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गैंट्ज यांच्या नोकराला गैंट्ज यांची हेरगिरी करताना अटक करण्यात आली आहे. इराणशी संबंधित एका हॅकर समूहासंदर्भात बोलणी करण्याच्या आरोपात या नोकराला अटक करण्यात आली आहे.

Spy in Israeli Defence Minister's home
इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांच्या घरात इराणी गुप्तहेर 
थोडं पण कामाचं
  • मोसाद या आपल्या जगविख्यात गुप्तहेर संघटनेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इस्त्रायलला इराणने दिला धक्का
  • इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांच्या नोकराला हेरगिरी करताना अटक
  • संरक्षण मंत्र्यांच्या घरी इराणचा गुप्तहेर सापडल्याने इस्त्रायलच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह

Spy in Israeli Defence Minister's home | जेरुसलेम : इस्त्रायल  (Israel)हा देश आपल्या लढवय्येपणासाठी, तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी, कडवेपणासाठी तर जगभर ओळखला जातोच. मात्र त्याचबरोबर त्याची एक आणखी मोठी ओळख आहे, ती म्हणजे त्यांची जगप्रसिद्ध गुप्तहेर संघटना मोसाद (Mosad). या मोसादच्या ताकदीवर आणि क्षमतेवर आक्रमकपणे जगभर दबदबा निर्माण करणाऱ्या इस्त्रायलला इराणने (Iran) मोठा झटका दिला आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गैंट्ज (Israeli Defence Minister)यांच्या नोकराला गैंट्ज यांची हेरगिरी (Spying)करताना अटक करण्यात आली आहे. इराणशी संबंधित एका हॅकर समूहासंदर्भात बोलणी करण्याच्या आरोपात या नोकराला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती इस्त्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांच्याच घरी इराणचा गुप्तहेर (Iran's Spy) पोचल्याने मोसादच्या सतर्कतेबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. (Israel : Iran's spy found in Israel's defence minister's home, big questions on Mosad)

संरक्षण मंत्र्यांच्या घरात साफसफाई करणारा नोकर

सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या शिन बेत या सुरक्षा विभागाने एक स्टेटमेंट देत म्हटले आहे की मध्य इस्त्रायलच्या लोद शहरातील ओमरी गोरेन या ३७ वर्षीय इस्त्रायली नागरिकाने इराणला माहिती पुरवण्यासाठी गैंट्ज यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. गोरेन याच्यावर आरोप आहे की त्याने संरक्षणंमंत्री गैंट्ज यांच्या घरात अनेक वर्षे साफसफाईचे काम केले. 

इराणशी निगडीत ब्लॅक शॅडो हॅकर समूहाशी संपर्क

ऑक्टोबरच्या शेवटी गोरेन यांने टेलीग्राम या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून इराणशी संबंधित ब्लॅक शॅडो समूहाशी संपर्क केला. गोरेन याने या हॅकर समूहाला इस्त्रायलचे संरक्षणमंत्री गैंट्ज यांच्या घरातून महत्त्वाची माहिती पुरवण्याची ऑफर दिली. हॅकर समूहाने गोरेनला सांगितले की ते त्याला एक मालवेअर देतील आणि तो मालवेअरला त्याला गैंट्ज यांच्या कॉम्प्युटरमध्ये घुसवायचे होते. गोरेनने मंत्र्यांच्या डेक्सचे फोटो, एक टॅबलेट, एक बंद तिजोरी, एक श्रेडर, आयपी नंबर असणारे कागदपत्रे, एक लेबल असलेले पॅकेज ज्यात स्मृति चिन्हांची सांकेतिक भाषा तयार करण्यात आली होती, इत्यादी गोष्टी चोरल्या होत्या गैंट्ज इस्त्रायलचे संरक्षणमंत्री असल्याने त्यांच्याकडे असणाऱ्या या गोष्टी होत्या. 

इस्त्रायलकडून उपाययोजना सुरू

इस्त्रायली सुरक्षा यंत्रणेने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की गैंट्ज यांना तपासाबद्दल माहिती देण्यात आली आहे. तपास अजूनही सुरू आहे. इस्त्रायली सुरक्षा यंत्रणेने म्हटले की या घटनेला लक्षात घेऊन भविष्यात पुन्हा असे घडू नये यासाठीच्या उपायांवर विचार सुरू करण्यात आला आहे. याआधी इराणकडून कित्येकवेळा आरोप करण्यात आले होते की इस्त्रायलचे गुप्तहेर त्यांच्याकडे हेरगिरी करत आहेत.

इस्त्रायल आणि इराण हे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. दोन्ही देश नेहमी ऐकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी अनेकवेळा इस्त्रायलचे हेर इराणमध्ये धुडगुस घालत असल्याच्या बातम्या येत होत्या. इराणनेदेखील इस्त्रायलचे हेर आपल्या देशात वावरत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मागील काही दिवसात या दोन देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी