इस्रायलची संसद विसर्जित, चार वर्षात देशात पाचव्यांदा निवडणूक

Israel parliament dissolves, sets 5th election in 4 years : इस्रायलची संसद गुरुवार ३० जून २०२२ रोजी विसर्जित करण्यात आली. देशात चार वर्षांत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Israel parliament dissolves, sets 5th election in 4 years
इस्रायलची संसद विसर्जित, चार वर्षात देशात पाचव्यांदा निवडणूक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • इस्रायलची संसद विसर्जित, चार वर्षात देशात पाचव्यांदा निवडणूक
  • इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड (Yair Lapid) आता देशाचे हंगामी पंतप्रधान
  • नफ्ताली बेनेट हे इस्रायलचे सर्वात कमी कालावधीसाठी राहिलेले पंतप्रधान

Israel parliament dissolves, sets 5th election in 4 years : इस्रायलची संसद गुरुवार ३० जून २०२२ रोजी विसर्जित करण्यात आली. देशात चार वर्षांत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये होणार आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड (Yair Lapid) आता देशाचे हंगामी पंतप्रधान म्हणून काम करतील. नव्या पंतप्रधानांची निवड झाल्यावर त्यांच्याकडे पदभार सोपवेपर्यंत ते कार्यरत राहतील असे दिसते. 

नफ्ताली बेनेट हे इस्रायलचे सर्वात कमी कालावधीसाठी राहिलेले पंतप्रधान ठरले. त्यांनी अपयशाची कबुली देत राजीनामा दिला. यानंतर इस्रायलच्या संसदेने देशाच्या घटनेतील तरतुदीचे पालन करून कोणताही पक्ष देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम दिसत नसल्यामुळे नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. संसदेनेचे हंगामी पंतप्रधानांची निवड केली. यानंतर संसद विसर्जित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अस्थिरता निर्माण झाल्यामुळे इस्रायलची संसद विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला ९२ सदस्यांनी पाठिंबा दिला आणि कोणीही विरोध केला नाही. यामुळे ठराव मंजूर झाला. 

सत्तेत सहभागी झालेल्यांमध्ये इस्रायलमधील अरब समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा एक पक्ष होता. या पक्षाने नाराजी व्यक्त केल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली होती. पॅलिस्टिनी नागरिकांच्या भागात ज्यू वसाहती स्थापन करण्याचा निर्णय इस्रायलने घेतला. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय दोन समाजात तेढ निर्माण करेल असे अरब समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाचे म्हणणे होते. या मुद्यावरून सत्ताधारी गटात मतभेद झाले आणि अस्थिरता निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी राजीनामा दिला होता.

याआधी इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू ही एकच व्यक्ती सलग बारा वर्षे देशाच्या पंतप्रधान पदावर कायम राहू शकली. सत्ता समीकरण साधण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आठ पक्षांना सोबत घेतले होते. 

बेंजामिन नेतन्याहूने १२ वर्षांनंतर गमावली सत्ता;आता इस्रायलच्या पंतप्रधानपदी नफ्ताली बेनेट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी