हवामान, घुसखोरी आणि सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह अवकाशात धाडलं, इस्त्रोनं मोठं यश मिळवलं!

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2019 | 09:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अतंराळ केंद्रावरून पीएसएलव्हीसी ४६ या यानासोबत रिसॅट-२ बी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं.

Isro_twitter
इस्त्रोचं मोठं यश, RISAT-2B उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण (@isro)  |  फोटो सौजन्य: Twitter

श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आज (बुधवार) श्रीहरीकोटा येथून पीएसएलव्ही-सी ४६ या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यासोबतच इस्त्रोने भारताच्या प्रत्येक हवामानाची पृथ्वीवरील माहिती देणारं इमेजिंग उपग्रह 'रिसॅट (RISAT)-2 बी' याचं देखील यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं आहे. जो हा या सीरिजमधील चौथा उपग्रह आहे. पीएसएलव्ही या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी मागील २५ तासांपासून काऊंट डाऊन सुरू करण्यात आलं होतं. काल (मंगळवार) पहाटे साडेचार वाजेपासून हे काऊंट डाऊन सुरू होतं. 

इस्रोच्या सांख्यिकीय तंत्रानुसार,  पीएसएलव्ही-सी ४६ हा हा उपग्रह आंध्रप्रदेशमधील श्रीहरिकोटामधील रॉकेट पोर्टच्या आधी लाँच पॅडवरून बुधवारी पहाटे ५:३० वाजता लाँच करण्यात आलं. उड्डाण केलेल्या रॉकेटसोबत ६१५ किलो वजनाचा रिसॅट-२ बी हा उपग्रह जोडण्यात आला आहे. जो आकाशातून भारताची गुप्तचर यंत्रणेची क्षमता आणखी मजबूत करेल. इस्त्रोच्या मते, रिसॅट-२ बी या उपग्रहाचा उपयोग हा शेती, वन विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी केले जाईल.

रॉकेट लाँचिंगनंतर जवळजवळ १५ मिनिटांनंतर रिसॅट-२ बी हे पृथ्वीपासून जवळजवळ ५५५ किमी दूर अंतराळाच्या कक्षेत स्थापित करण्यात आलं आहे. या उपग्रहाद्वारे जमिनीवर 3 फूट उंचीपर्यंतचे उत्कृष्ट फोटो घेतले जाऊ शकतात. हे उपग्रह आपत्ती बचाव कार्यात सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणात मदत करेल. एवढेच नाही तर, सीमा रेषेवरील घुसखोरी रोखण्यासाठी देखील सुरक्षा दलांना मदत करेल.

या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रोने आनंद व्यक्त केला आहे. इस्रोच्या प्रमुख शिवन यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं आहे की, हे खूप मोठं यश आहे. ज्यासाठी सर्वच शास्त्रज्ञांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. दरम्यान, रिसॅट सीरीजचा पहिला उपग्रह हा २००९ मध्ये लाँच करण्यात आला होता. जो इस्त्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीजने विकसित केला होता. 

दरम्यान, इस्त्रोने काही दिवसांपूर्वीच एक दुसरी मोठी घोषणा देखील केली होती. भारताची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-२' मोहीम लवकरच पार पडणार आहे. ९ ते १६ जुलैदरम्यान, या चांद्रयानाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. या चांद्रयानंच वैशिष्ठ्य म्हणजे हे चंद्राच्या दक्षिण धुव्रावर जाणार आहे. आजवर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर फारसं संशोधन न झाल्याने भारताची चांद्रयान-२ ही मोहीम फारच विशेष आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ही मागील काही दिवसांपासून अतिशय मोठमोठ्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडत आहे. त्यामुळे अंतराळ विज्ञान संशोधन विश्वात भारताचा मोठा दबदबा निर्माण होण्यास मदत होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हवामान, घुसखोरी आणि सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह अवकाशात धाडलं, इस्त्रोनं मोठं यश मिळवलं! Description: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अतंराळ केंद्रावरून पीएसएलव्हीसी ४६ या यानासोबत रिसॅट-२ बी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles