Helicopter crash : १२ वी ला मिळालेले गुण तुमचे नशीब नाही ठरवू शकत, हेलिकॉप्टर अपघातात वाचलेले एकमेव व्यक्ती कॅ. वरुण सिंह यांचे पत्र व्हायरल

हरियाणातील चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूल मधून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. शाळेत एक साधारण विद्यार्थी असणे चुकीचे नाही असा संदेश वरुण सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला होता.  Group Captain Varun Singh in his letter to school

varun singh iaf
कामासाठी झोकून द्या 
थोडं पण कामाचं
  • ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत
  • हरियाणातील चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूल मधून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले
  • जर तुम्हाला शाळेत ९० टक्के गुण मिळत नसतील तर दुःखी होऊ नका

तमिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात वाचलेले एकमवेम व्यक्ती ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा वरुण सिंह यांना शौर्य चक्र मिळाले होते तेव्हा त्यांनी हे पत्र आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिले होते. हरियाणातील चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूल मधून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. शाळेत एक साधारण विद्यार्थी असणे चुकीचे नाही असा संदेश वरुण सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला होता.  

सामान्य विद्यार्थी असणे चुकीचे नाही

तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सैन्याच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये १४ जण उपस्थित होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात  बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचाही समावेश होता. या अपघातात कॅप्टर वरुण सिंह वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. वरुण सिंह यांचे एक पत्र व्हायरल होत आहे. शाळेत एक सामान्य विद्यार्थी असणे चुकीचे नाही असे वरुण सिंह यांनी या पत्रात म्हटले अहए. शाळेत प्रत्येक विद्यार्थी असामान्य नसतो. प्रत्येक विद्यार्थी ९० टक्के गुण नाही मिळवू शकत. जर कोणी ९० टक्के मिळवत असेल तर त्याचेही कौतुक केलेच पाहिजे असे वरुण सिंह यांनी म्हटले आहे.

कामासाठी झोकून द्या

जर तुम्हाला शाळेत ९० टक्के गुण मिळत नसतील तर दुःखी होऊ नका असा सल्ला वरुण सिंह यांनी दिला आहे. तुम्ही शाळेत एक सामान्य विद्यार्थी असू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावी आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. आपला आतला आवाज ऐका, तुमच्या आयुष्यात संगीत, ग्राफिक डिझाईन, साहित्य अशा अनेक गोष्टीत तुम्हाला नैपुण्य मिळवू शकता येतं. तुम्ही जे काही काम कराल त्या कामसाठी स्वतःला झोकून द्या असा सल्ला वरुण सिंह यांनी दिला आहे. आपले प्रयत्न कमी पडत आहे, असा विचार करून निराश होऊ नका असेही सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.  

विमानांबद्दल पॅशन

राष्ट्रीय रक्षा आकदमीत जेव्हा मी एक कॅडेट म्हणून सामील झले तेव्हा मी ना अभ्यासात हुशार होत ना खेळात. परंतु जेव्हा भारतीय नौदलात पोहोचलो तेव्हा मला विमानांनबद्दल प्रेम आणि पॅशन निर्माण झाले. या क्षेत्रात मी माझ्या सहकार्‍यांच्या खूप पुढे होते. मला माझ्या क्षमतांवर फार विश्वास नव्हता असेही सिंह म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी