विमानातून आला धूर, प्रवाशांची उडाली तारांबळ

Jabalpur-bound SpiceJet flight returns to Delhi after smoke detected in plane : दिल्लीहून जबलपूरला जात असलेल्या स्पाईसजेटच्या विमानात धूर येऊ लागला. या धुरामुळे प्रवाशांना त्रास होऊ लागला. यानंतर विमान परत दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. 

Jabalpur-bound SpiceJet flight returns to Delhi after smoke detected in plane
विमानातून आला धूर, प्रवाशांची उडाली तारांबळ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विमानातून आला धूर, प्रवाशांची उडाली तारांबळ
  • धुरामुळे प्रवाशांना त्रास होऊ लागला
  • विमान तातडीने विमानतळावर उतरवले

Jabalpur-bound SpiceJet flight returns to Delhi after smoke detected in plane : दिल्लीहून जबलपूरला जात असलेल्या स्पाईसजेटच्या विमानात धूर येऊ लागला. या धुरामुळे प्रवाशांना त्रास होऊ लागला. यानंतर विमान परत दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. 

विमानाने दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. आकाशात विमान पाच हजार फूट उंचीवर होते त्यावेळी विमानाच्या केबिनमध्ये धूर येऊ लागला. धूर येत असल्याचे पाहून वैमानिकाने तातडीने दिल्ली विमानतळावर परत जाण्याचा निर्णय घेतला आणि नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून अंमलात आणला. विमान दिल्ली विमानतळावर उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना दिल्लीत येताच विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर  विमानाचा ताबा तंत्रज्ञांनी घेतला. धूर येण्याचे कारण तपासण्यास आणि धुराची समस्या दुरुस्त करण्यासाठी काम सुरू झाले.

काही दिवसांपूर्वी स्पाईसजेटच्या पाटणा-दिल्ली  विमानाच्या इंजिनला आग लागली. उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात पक्ष्याची धडक बसल्यामुळे ही घटना घडली. यानंतर विमान परत पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या विमानातून बाहेर काढण्यात आले. पर्यायी विमानातून प्रवाशांच्या प्रवासाची सोय करण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी