जगदीप धनखर आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार, देशाचे १४वे उपराष्ट्रपती होणार

Jagdeep Dhankhar to take oath as 14th Vice President of India : जगदीप धनखर आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. ते देशाचे चौदावे उपराष्ट्रपती होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना शपथ देतील. 

Jagdeep Dhankhar to take oath as 14th Vice President of India
जगदीप धनखर आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जगदीप धनखर आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार
  • देशाचे १४वे उपराष्ट्रपती होणार
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना शपथ देतील

Jagdeep Dhankhar to take oath as 14th Vice President of India : नवी दिल्ली : जगदीप धनखर आज उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. ते देशाचे चौदावे उपराष्ट्रपती होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना शपथ देतील. 

भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती (तेरावे उपराष्ट्रपती) व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपला आहे. हा कार्यकाळ संपण्याआधीच चौदाव्या उपराष्ट्रपतींसाठी निवडणूक झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य (लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार) मतदान करण्यासाठी पात्र असतात. या नियमानुसार ७८० जण मतदानासाठी पात्र होते. यापैकी ७२५ जणांनी मतदान केले. पण १५ मते अपात्र ठरली. उर्वरित ७१० मतांपैकी ५२८ मते एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांना मिळाली. विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. धनखर यांचा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ३४६ मतांनी विजय झाला. 

सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलेले जगदीप धनखर जनता दलच्या माध्यमातून राजस्थानच्या राजकारणात सक्रीय झाले. नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या. आमदार, खासदार, पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारच्या काळात संसदीय कामकाजाचे राज्यमंत्री अशी पदे हाताळणारे जगदीप धनखर नंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले. आता ते उपराष्ट्रपती म्हणून नवी कारकिर्द सुरू करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी