राम रहीम जेलबाहेर येणार, 'यासाठी' हरियाणा सरकार मंजूर करणार पॅरोल?

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 24, 2019 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ram Rahim: बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी राम रहीम याला पॅरोल मंजूर होण्याची शक्यता आहे. कारण की, हरियाणा सरकारने त्याच्या चांगल्या वागणुकीचा हवाला दिला आहे. 

ram_rahim_pti
राम रहीम जेलबाहेर येणार, 'यासाठी' हरियाणा सरकार मंजूर करणार पॅरोल?  |  फोटो सौजन्य: PTI

चंदीगड: बलात्कार प्रकरणातील दोषी आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला पॅरोलवर सोडण्याची हरियाणा सरकारने शिफारस केली आहे. राम रहीम याला पॅरोल मंजूर व्हावा यासाठी हरियाणा सरकारने 'चांगली वागणूक' असं कारण दिलं आहे. दरम्यान, राम रहीम यांच्या पॅरोलबाबत अंतिम निर्णय हा कमिश्नर कोर्टाचा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील अधिकारी हे राम रहीम याच्या चांगल्या वागणुकीचा हवाला देत त्याला पॅरोलवर सोडण्याच्या निर्णयावर सहमत आहेत. या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, राम रहीमची जेलमध्ये चांगली वर्तणूक आहे. त्यामुळे त्याला पॅरोल मिळणं आणि काही दिवस त्याची जेलमधून सुटका होणं हे योग्य असल्याचं कारागृह अधिकाऱ्यांना वाटतं. 

दरम्यान, जेल अधिक्षकांनी राम रहीमला पॅरोलवर सोडण्यास मंजुरी दिली असल्याचं समजतं आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, राम रहीमचं आचरण चांगलं आहे. जेलमध्ये त्याचे कुणाशीही काहीही वाद झालेले नाहीत. त्यामुळे आता राम रहीमला पॅरोल मिळणार असं  जवळजवळ निश्चित झालं आहे. बलात्कार प्रकरणी दोन वर्षांपूर्वी पंचकुला कोर्टाने राम रहीमला शिक्षा सुनावली होती. राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर त्यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठी हिंसा केली होती. मोठी दंगल त्यावेळी उसळली होती. या समर्थकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले होते. 

हरियाणामध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशावेळी हरियाणा सरकारचा हा निकाल लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की, हरियाणामध्ये राम रहीमच्या अनुयायांची मोठी संख्या आहे. 

आपल्याच दोन महिला शिष्यांवर अनेक वर्ष बलात्कार करणाऱ्या गुरमीत राम रहीम याला २०१७ साली २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय ३० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. दोन बलात्कार प्रकरणात राम रहीमला १०-१० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  सीबीआयच्या विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती. १९९९ मध्ये आपल्याच दोन शिष्यांवर बलात्कार आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या राम रहीमला कोर्टाने शिक्षा सुनावली होती. २००२ साली राम रहीम विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आली होती. राम रहीम याला शिक्षा सुनावताच संपूर्ण हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. ज्यामध्ये तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २६४ हून अधिक जण हे जखमी झाले होते. यावेळी अनेक वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली होती. 

दरम्यान, राम रहीम याला खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पत्रकार रामचंद्र छत्रपति  यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या राम रहीम याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राम रहीम जेलबाहेर येणार, 'यासाठी' हरियाणा सरकार मंजूर करणार पॅरोल? Description: Ram Rahim: बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी राम रहीम याला पॅरोल मंजूर होण्याची शक्यता आहे. कारण की, हरियाणा सरकारने त्याच्या चांगल्या वागणुकीचा हवाला दिला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles