रस्त्यात घडलं असं काही की, लग्नानंतरही नवरी पोहोचू शकली नाही सासरी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2019 | 15:33 IST | टाइम्स नाऊ हिंदी

राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न झाल्यानंतर सासरी जाणाऱ्या नवरीचं काही गुंडांनी अपहरण केलं. काय घडलं नेमकं जाणून घेऊया...

Bride kidnapped
नववधूचं अपहरण  |  फोटो सौजन्य: Getty Images

जयपूर: राजस्थानच्या जयपूर इथल्या धोद भागात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इथं एक विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नानंतर सासरी निघालेल्या नवरीचं काही गुंडांनी रस्त्यातच अपहरण केलं. घटना जयपुरच्या नागवा गावातील आहे. जिथं लग्नानंतर बोलेरो आणि इतर वाहनांनी नवरदेव-नवरी आणि त्यांचे नातेवाईक जात असतांना त्यांच्यावर हल्ला झाला. गुंडांनी काठ्यांनी हल्ला करत लोकांना मारहाण केली आणि नवरीचा जबरदस्तीनं आपल्यासोबत घेऊन गेले.

पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी दोन तरुणांसह सात-आठ मुलांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार १६ एप्रिलला धोद इथं राहणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही मुली सोनू आणि हंसाचं लग्न झालं. रात्री जवळपास अडीच वाजता लग्नसमारंभ आटोपला आणि वरात इनोव्हानं निघाली. रस्त्यामध्ये एक बोलेरो आणि आणखी एका गाडीनं इनोव्हा गाडीचा पाठलाग करणं सुरू केलं. पुढे जावून या दोन्ही गाड्यांमधून काही लोक काठ्या घेऊन उतरले.

हे सर्व बदमाश लोक ७-८च्या संख्येनं होते. यासर्वांनी गाडीतून उतरून इनोव्हावर हल्ला करणं सुरू केलं आणि गाडीच्या काचा फोडल्या. इनोव्हामध्ये बसलेले सर्व लोक घाबरून गेले. यानंतर त्या गुंडांनी गाडीमध्ये बसून असलेल्या दोन्ही नवऱ्यांपैकी हंसाचा हात धरून तिला खाली उतरवलं आणि आपल्या सोबत घेऊन गेले. विरोध करणाऱ्या लोकांना त्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणावर गुंडांना लग्नासंबंधीत सर्व माहिती पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितलं की, ते नवरीच्या नातेवाईकांकडूनही कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांचं म्हणणं आहे की ते लवकरच नवरीचा शोध घेतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडांनी तिथं हवेत गोळीबारही केला, त्यामुळं गाडीतील लोक खूप घाबरले होते. या नंतर गुंडांनी गाडीचा दरवाजा न उघडताच नवरीला ओढून आपल्या ताब्यात घेतलं आणि जाता जाता ते गाडीची किल्ली पण घेऊन गेले. या प्रकरणा मागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीय. पण पोलीस यासंदर्भात एकतर्फी प्रेमाचा काही अँगल आहे का याचा तपास करत आहेत. पोलीस मुलीच्या घरच्यांचीही कसून चौकशी करत आहेत.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
रस्त्यात घडलं असं काही की, लग्नानंतरही नवरी पोहोचू शकली नाही सासरी Description: राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न झाल्यानंतर सासरी जाणाऱ्या नवरीचं काही गुंडांनी अपहरण केलं. काय घडलं नेमकं जाणून घेऊया...
Loading...
Loading...
Loading...