पुलवामासारख्या हल्ल्याच्या तयारीत जैश-ए-मोहम्मद, दहशतवाद्यांनी भारताला पुन्हा धमकी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 00:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

दहशतवाद्यांवर करवाई करण्याचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. जैश-ए-मोहंमदच्या दहशतवाद्यांनी भारतात पुलवामासारख्या हल्लाची धमकी पुन्हा एकदा दिली आहे. पाहा व्हिडिओ

jaish e mohammad member threatening india
जैश-ए-मोहंमदची भारताला पुन्हा धमकी 

नवी दिल्ली :  भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे षडयंत्र पाकिस्तानातून रचले जात असल्याचं वारंवार समोर आलं आहे. दहशतवाद्यांना पोषक वातावरण मिळवून देण्याचं काम पाकिस्तान नेहमीच करत आले आहे. नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनाना आवर घालण्याचे पाकिस्तानने अनेकदा दावे केले होते. पण पाकिस्तानचं पितळ आता उघड पडलं आहे. दहशतवादातून भारताबरोबरच संपूर्ण जगाला वेठीस धरण्याचं काम पाकिस्तानातून सातत्याने होत आहे. दहशतवाद्यावर कारवाईच्या नावाखाली पाकिस्तान जगाची फसवणूक करत आहे. नुकताच टाइम्स नाऊच्या हाती एक व्हिडिओ लागला आहे. आणि या व्हिडिओमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी भारतात घातपात घडवून आणण्याची धमकी देताना दिसत आहे. जैशचा हा दहशतवादी धमकी देताना म्हणाला की, 'त्याची संघटना येणाऱ्या काळात भारतात पुलवामासारखा हल्ला करणार आहे.'

आश्चर्य या गोष्टीचे वाटते की पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान एकीकडे नव्या पाकिस्तानची घोषणा करतात, आर्थिक तंगीतून पाकिस्तानाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी लष्कराचं बजट कमी करण्याबरोबरच दहशतवादी संघटनांना आवर घालण्याचे दावेही केले आहेत. पण जैशचा हा व्हिडिओ त्यांचा खोटारडेपणाच सिद्ध करतो आहे. पाकिस्तानातील या दहशतवादी संघटना तसेच दहशतवादी पहिल्यासारखेच मुक्त वावर करताना दिसत आहेत आणि भारतविरोधी षडयंत्र रचण्यात मग्न आहेत. 

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जैशचा दहशतवादी असं म्हणतो की, “तो पुढील काही दिवसात पुलवामासारखा हल्ला करणार आहे आणि त्यांचा जिहाद भारताचा अंत करुनच संपेल.” जैश-ए-मोहंमदचे मुख्यालय पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जैशच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवली होती. जैशचा म्होरक्या मौलाना मसुद अजहर याला भारताबरोबरच जगभरातुन जागतिक दहशतवादी घोषित केलं असुनही त्याला पाकिस्तानने संरक्षण दिलं आहे. मसुद अजहर जगभरातील सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असूनही त्याच्या दहशतवादी हालचाली बंद होताना दिसत नाहीत.

तसेच काही दिवसांपूर्वी भारतीय सीमेवर दहशतवादी घुसखोरी करणार असल्याचा एक रिपोर्ट देण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ ला झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास ४० सैनिक शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अक्षरश: युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायुसेनेनं २६ फेब्रुवारीला जैशच्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्र बालाकोटवर हल्ला चढवला होता. या एअरस्ट्राईकमध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले होते.           

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान भारताबरोबर चर्चेसाठी उतावळे झाले होते. त्यांनी बिश्केकमध्ये शांघाई सहयोग संघठन (एससीओ)च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा प्रकट केली होती. यासाठी त्यांनी पत्रही लिहिले होते पण भारताने त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला होता. जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यत भारत पाकिस्तानबरोबर चर्चा करणार नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही यावर स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी सांगितले, “भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोणत्याही बैठकीचा प्रस्ताव आलेला नाही. पाकिस्तान चर्चेसाठी गंभीर असेल तर त्यांनी दहशतवादावर पूर्णपणे आवर घालावा.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पुलवामासारख्या हल्ल्याच्या तयारीत जैश-ए-मोहम्मद, दहशतवाद्यांनी भारताला पुन्हा धमकी Description: दहशतवाद्यांवर करवाई करण्याचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. जैश-ए-मोहंमदच्या दहशतवाद्यांनी भारतात पुलवामासारख्या हल्लाची धमकी पुन्हा एकदा दिली आहे. पाहा व्हिडिओ
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: दसऱ्याला मुंबईसह देशभरातील ६ मंदिरात बॉम्बस्फोटाने उडवण्याची 'जैश-ए-मोहम्मद'ची धमकी
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १५ सप्टेंबर २०१९: आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली ते PUBG मुळे तरूणाला वेड लागलं
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
[VIDEO]: 'हाउडी मोदी' कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प एकत्र, ५०,००० नागरिकांना संबोधित करणार
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
अजबच! रिक्षा चालकाने सीट-बेल्ट न लावल्याच्या ठपका, वाहतूक पोलिसाने ठोठावला प्रचंड दंड
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
आंध्रप्रदेशमध्ये बोट बुडाली; 11 जणांचा मृत्यू, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू 
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
PM Narendra Modi birthday LIVE UPDATES: नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक 
Rajasthan Floods: पुरामुळे शाळेत अडकले 350 हून अधिक विद्यार्थी आणि 50 शिक्षक