जालियनवाला बाग हत्याकांडप्रकरणी ब्रिटनने मागितली जाहीर माफी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 11, 2019 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काळे पान मानल्या जाणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडप्रकरणी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्या संसदेत जाहीरपणे माफी मागितली.

Theresa May
जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी ब्रिटनच्या संसदेत माफीनामा  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • जालियनवाला बाग हत्याकांडावर ब्रिटनच्या संसदेत माफिनामा
  • ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मागितली माफी
  • १३ एप्रिल २०१९ रोजी हत्याकांडाला १०० वर्षे होणार

लंडन : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वांत दुदैवी घटना मानल्या जाणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडाविषयी तब्बल १०० वर्षांनी इंग्रजांनी माफी मागितली आहे. ‘जालियनवाला बाग हत्याकांड खूपच दुदैवी होते. जे काही घडले त्याविषयी आम्ही खेद व्यक्त करत आहोत,’ अशा शब्दांत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी लंडनमध्ये संसदेत माफी मागितली आहे. पंजाबमध्ये अमृतसर येथे १३ मे १९१९ रोजी जालियनवाला बाग येथे इंग्रजांनी बेछूट गोळीबार करून निष्पाप भारतीयांचा जीव घेतला होता.

ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या सत्तेत त्यांनी अनेक क्रूर कृत्ये केली. त्यात जालियनवाला बाग हत्याकांडाचा प्रमुख घटनांमध्ये उल्लेख केला जातो. या अमानवी घटनेनंतर गेल्या शंभर वर्षांत याविषयी ब्रिटनमध्ये अनेकवेळा चर्चा झाल्या होत्या. पण, ब्रिटनकडून माफी मागण्यात आलेली नव्हती. सध्याच्या सभागृहात विरोधीपक्ष नेते जेर्मी कॉर्बयान यांनी ‘पूर्ण आणि स्पष्ट शब्दांत माफी मागावी’, अशी मागणी केली होती. या विषयावर २०१३मध्येही ब्रिटनच्या संसदेत चर्चा झाली होती. त्यात तात्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी जालियनवाला घटना खूप लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी सभागृहात स्पष्ट माफी मागितलेली नव्हती. येत्या १३ एप्रिल रोजी या दुर्दैवी घटनेला १०० वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी या घटनेविषयी स्पष्ट माफी मागितली आहे.

असे झाले होते हत्याकांड?

घटना घडली त्यावेळी अमृतसरमध्ये ब्रिटिश पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. पण, बैसाखी सणाच्या निमित्तानं अमृतसरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. जालियनवाला बागमध्ये एक जाहीर सभा आयोजित केली होती. त्या सभेत भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी काही नेते बोलत होते. तर, काही जण बोलणार होते. त्या ठिकाणी जमलेल्या भारतीयांवर तात्कालीन ब्रिगेडियर जनरल रेजीनॉल्ड डायर याने गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर त्याने आपल्यावर भारतीयांनी हल्ला केल्याचा बनाव केला होता. पुढे शहीद उधम सिंग यांनी लंडनमध्ये जनरल डायरची गोळ्या झाडून हत्या केली. उधम सिंग यांना लंडनमध्ये फाशीची शिक्षाही देण्यात आली. पण, ब्रिटिश आजही डायरची हत्या झाली नसल्याचं सांगतात.

किती जणांचा बळी गेला?

जालियनवाला बाग हत्याकांडात किती जणांचा बळी गेला. याविषयी शंभर वर्षानंतरही संभ्रम आहे. त्यावेळी घटनेचे गांभीर्य कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ४०० जणांचा बळी गेल्याची आकडेवारी जाहीर केली होती. मात्र, भारतीयांच्या म्हणण्यानुसार या हत्याकांडात १ हजार जणांचा बळी गेला होता. हत्याकांड झालेल्या ठिकाणी एक विहीर होती. त्या विहिरीतूनच १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी