J&K News: चकमकीच्या काही क्षणापूर्वी लष्करी अधिकाऱ्याचा दहशतवाद्याला Video Call; म्हणतात की, ''मित्रा...''

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Sep 30, 2022 | 18:57 IST

Encounter In J&K: सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (JeM) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. अहवाटू (Ahwatoo village) गावात 27 सप्टेंबर रोजी ही चकमक झाली.

 Encounter In J&K
चकमकीपूर्वी लष्करी अधिकाऱ्याचा दहशतवाद्याला Video Call 
थोडं पण कामाचं
  • सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (JeM) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले.
  • ठार झालेल्यांमध्ये एक जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammad) सदस्य मोहम्मद शफी गनई होता.
  • अधिकाऱ्यानं चकमकीआधी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले.

श्रीनगर: Army Officer Video calls To terrorists: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir)  कुलगाम जिल्ह्यात (Kulgam district) झालेल्या चकमकीत (Encounter) दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (JeM) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. अहवाटू (Ahwatoo village) गावात 27 सप्टेंबर रोजी ही चकमक झाली. दरम्यान ठार झालेल्यांमध्ये एक जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammad) सदस्य मोहम्मद शफी गनई होता. ज्याचं चकमकीच्या काही वेळापूर्वी भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याशी (Indian Army officer) संभाषण झालं होतं. अधिकाऱ्यानं चकमकीआधी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांनी नकार दिला. लष्कराच्या अधिकाऱ्यानं दहशतवाद्यांना व्हिडिओ कॉल (video call) केला होता. 

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने कुलगामच्या अहवाटू भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. ऑपरेशनआधी, एका भारतीय अधिकाऱ्याने गनईला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यानं नकार दिला. 
 

अधिक वाचा- अंधेरीत हॉटेलच्या रूममध्ये मॉडेलनं संपवलं आयुष्य, सुसाईट नोटमध्ये केला मोठा खुलासा  

सुरक्षा दलांला कुलगामच्या अहवाटू भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. आता लष्करी अधिकारी आणि दहशतवादी यांच्यातील व्हिडिओ कॉल व्हायरल झाला आहे. 

व्हिडिओमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी म्हणतो की, 'शपथ, ज्या प्रकारे लष्कर काश्मीरला सपोर्ट करते, त्याचप्रमाणे काश्मीरही लष्कराला सपोर्ट करते.' यानंतर लष्कराच्या अधिकाऱ्याने दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

यावर दहशतवादी अधिकाऱ्याला विचारतो की, तू सैन्याचा आहे का?. यावर अधिकारी म्हणतो की, "मित्रा, मी सैन्याचा आहे. मी तुला आत्मसमर्पण करायला सांगत आहे." त्यावर दहशतवादी उत्तर देतो, "सर, मी आधीच मृत्यूच्या अगदी जवळ आहे. तुम्ही मला तीन वेळा गोळी घालाल. तुम्ही कदाचित संपूर्ण मॅग्जीन रिकामे कराल." यावर अधिकारी म्हणतात, "नाही, मित्रा, आम्ही असे करणार नाही." त्यानंतर संवाद संपतो. यानंतर काही वेळातच दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा होतो. 

याआधी लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून कुलगाम जिल्ह्यातील अवहातू गावात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय सैन्याने जेकेपी आणि सीआरपीएफ सोबत 27 सप्टेंबर 22 रोजी पहाटे 3.20 वाजता या भागात हल्ला केला. यावेळी संयुक्त नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली.

काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), विजय कुमार यांनी  दिलेल्या माहितीनुसार, यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे दोन स्थानिक दहशतवादी चकमकीत ठार झाले. दोन्ही दहशतवादी अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी