School Bus fell in ditch which was enroute to Udhampur : जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यातील मसुरा जवळ मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात १८ जण जखमी झाले. जखमींमध्ये ८ विद्यार्थी आहेत. । अपघात
बस उधमपूर येथून बारमीन गावात जात होती. बस रस्त्यावरून घसरली आणि दरीत कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या अपघात प्रकरणी तपास सुरू केला आहे.