Terror Attack: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दहशतवादी हल्ल्यानं हादरलं जम्मू-काश्मीर, ग्रेनेड हल्ल्यात जवान जखमी

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 07:03 IST

Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी (Terrorist)सुरक्षा दलांवर (Security Forces) हल्ला (Attack)केला आहे.

Terror Attack
जम्मू काश्मीर  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी (Terrorist)सुरक्षा दलांवर (Security Forces) हल्ला (Attack)केला आहे.
  • दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड Grenade) फेकून हल्ला केल्याचं समोर येत आहे.
  • या हल्ल्यात सीआरपीएफचा (CRPF)एक जवान जखमी झाला आहे.

श्रीनगर: Terror Attack on Security Forces: एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी (Terrorist)सुरक्षा दलांवर (Security Forces) हल्ला (Attack)केला आहे. जम्मू-काश्मीरमधील अली जान रोडवर  (Ali Jan Road) दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड Grenade) फेकून हल्ला केल्याचं समोर येत आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा (CRPF)एक जवान जखमी झाला आहे. देशभरात सध्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी बंदोबस्त वाढवला आहे.

इदगाहजवळ दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जवान सतर्क झाले आणि त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. सध्या सर्च ऑपरेशन  (Search Operation)सुरू केलं आहे. श्रीनगर पोलिसांनी (Srinagar Police) या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे. माहिती देताना त्यांनी सांगितलं की, जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

अधिक वाचा-  उद्धव ठाकरेंनी घराविषयी केलेल्या प्रश्नाला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर; काढला माजी मुख्यमंत्र्यांचा अभ्यास

सद्यपरिस्थितीत जम्मू-काश्मीरमधील पोस्ट सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ले वारंवार होत असतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हे नापाक कुरापती सातत्यानं वाढत आहे. याआधी शुक्रवारी ही अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात दहशतवाद्यांनी पोलीस/सीआरपीएफच्या संयुक्त नाका पार्टीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला. हल्ल्यानंतर जखमी पोलिसाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. 

बांदीपोरामध्ये मजुरावर गोळीबार 

यापूर्वी, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारमधील एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या केली.  काश्मीर झोनच्या पोलिसांनी या घटनेची ट्विट करून माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, मध्यरात्रीच्या सुमारास बांदीपोरा येथील सोडनारा संबल येथे दहशतवाद्यांनी मोहम्मद अमरेज, मुलगा मोहम्मद जलील, मधेपुरा, बिहारमधील बेसड येथे राहणाऱ्यांवर गोळीबार केला आणि त्यांना जखमी केलं. 

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न

उद्या देश स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे, अशा परिस्थितीत हे  दहशतवादी हल्ले देशाचा हा उत्साहावर विरजण टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे हल्ले अशा वेळी झाले आहेत जेव्हा उद्या देश स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. त्याच वेळी, या आठवड्यात गुरुवारी (11 ऑगस्ट) दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या छावणीवर आत्मघाती हल्ला केला, ज्यामध्ये चार जवान शहीद झाले. सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवादीही ठार झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी