भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

BJP workers killed: भारतीय जनता पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात

hree BJP workers shot dead in kulgam
भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला 
  • भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी तीन स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेला कुलगाम पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली आहे की, पीडितांमध्ये फिदा हुसैन यातू, उमर रमजान हाजम  आणि उमर राशिद बैग या तिघांचा समावेश आहे. या तिघांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर तेथून पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या या तिन्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा युवा सरचिटणीस फिदा हुसैन यातू, भाजप कार्यकर्ता उमर राशिद बैग आणि उमर रमजान हाजम या तिघांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. हे तिघेही वाईकेपूरा येथील निवासी होते.

या घटनेनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, "दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून एक भयानक वृत्त समोर आले आहे. दहशतवाद्यांनी तीन भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो."
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी