Landslide At Jammu: जलविद्युत प्रकल्पात भूस्खलन; चार मजूर ठार, 6 जखमी

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Oct 30, 2022 | 09:33 IST

Landslide At Jammu And Kashmir Tunnel: शनिवारी काम सुरू असताना डोंगरावरून झालेल्या मोठ्या भूस्खलनात (landslide) चार मजूर ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Landslide in Jammu
जलविद्युत प्रकल्पात भूस्खलन; चार ठार, 6 जखमी 
थोडं पण कामाचं
  • अपघातानंतर सुरू असलेले मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे.
  • मजूर रतले पॉवर प्रोजेक्ट साइटजवळ एका लिंक रोडच्या बांधकामावर काम करत होते.
  • मदतकार्य सुरू केल्यानंतर लगेचच एका सहायक पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.

श्रीनगर: Landslide in Jammu:   जम्मूच्या किश्तवाडमधील (Jammu's Kishtwar) रतले जलविद्युत (Hydroelectric Project)  प्रकल्पाच्या बांधकामाधीन असलेल्या जागेवर शनिवारी काम सुरू असताना डोंगरावरून झालेल्या मोठ्या भूस्खलनात (landslide)  चार मजूर ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुरू असलेले मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

बांधकाम सुरू असताना अपघात

पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना किश्तवाडचे उपायुक्त (डीसी) देवांश यादव यांनी सांगितले की, मजूर रतले पॉवर प्रोजेक्ट साइटजवळ एका लिंक रोडच्या बांधकामावर काम करत होते. कामाच्या ठिकाणी जेसीबी मशिन खोदत असताना मोठा दगड आदळून मजूर अडकले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सहा जणांचे पथक घटनास्थळी पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर या भागात आणखी एक भूस्खलन झालं. ज्यामुळे अधिक लोक अडकले गेले. मदतकार्य सुरू केल्यानंतर लगेचच एका सहायक पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.

अधिक वाचा-  हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी, 151 जणांचा मृत्यू; 82 जखमी 

या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला

त्याचवेळी या अपघातात पोलीस कर्मचारी आणि जेसीबी ऑपरेटरसह चार जणांचा मृत्यू झाला. मनोज कुमार असे जेसीबी ऑपरेटरचे नाव आहे. केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीरमधील उधमपूरचे खासदार जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, रतले पॉवर प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलनाचे वृत्त मिळाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलून चौकशी केली. या अपघातात जेसीबी चालकाचा जागीच मृत्यू झाला. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी