अनंतनागमध्ये CRPF च्या पथकावर  दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीद

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 20:00 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

J&K Five CRPF jawans martyred: जम्मू काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर हा हल्ला केला आहे. ज्यात ५ जवान शहीद झाले आहेत. चकमक अजूनही सुरू आहे.

J&K: five CRPF jawan martyred
अनंतनागमध्ये CRPF च्या पथकावर  दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीद  |  फोटो सौजन्य: ANI

श्रीनगरः जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी पोलिसांना निशाणा बनवून हल्ला केला. जखमींमध्ये एक सामान्य नागरिकांचा देखील समावेश आहे. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना चांगलचं प्रत्त्युतर दिलं जात आहे. पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये अनंतनागमध्ये हा दहशतवादी हल्ला अमरनाथ यात्रा सुरू होण्याआधी झाला आहे. अमरनाथ यात्रा १ जुलैपासून सुरू होणार असून १५ ऑगस्टला श्रावण पौर्णिमाच्या दिवशी संपन्न होणार आहे. अनंतनाग हल्ल्याची जबाबदारी अल- उमर मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. 

अनंतनागमधल्या केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीनंतर सर्व भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे.  या चकमकीत जखमी झालेल्या जवानांना अनंतनागच्या सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

या भागात बस स्थानक असल्यामुळे मोठ्या संख्येनं लोकांची रहदारी असते.  तसंच येथे नेहमीच सुरक्षा दल तैनात असतात. याच कारणानं दहशतवाद्यांनी निशाणा साधत गोळीबार केला.  दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक मुलगी देखील जखमी झाली आहे. या मुलीची स्थिती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. दहशतवाद्यांसोबत चकमक या भागात अद्यापही सुरू असली तरी एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. 

सुरक्षा दलानं ऑपरेशन ऑल आऊट सुरू केल्यापासून दहशतवाद्यांच्या कारवाईत आणखीन वाढ झाली आहे. दहशतवादी सुरक्षा दलाला निशाणा बनवत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मोठ्या संख्येनं दहशतवादी ठार झाले.  

Breaking News

दरम्यान शनिवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलानं दहशतवाद्याला ठार केलं आहे. ही चकमक अनंतनाग जिल्ह्यातील वेरिनाग भागात झाली. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तहेरांकडून सुरक्षा दलाला मिळाली होती.  गेल्या काही दिवसात सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरूद्धची आपली मोहीम आणखी तीव्र केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या कारवाया उधळून लावण्यात सुरक्षा दलांना यश येत आहे. पण असं असलं तरीही काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया या काही अद्याप कमी झालेल्या नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अनंतनागमध्ये CRPF च्या पथकावर  दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीद Description: J&K Five CRPF jawans martyred: जम्मू काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर हा हल्ला केला आहे. ज्यात ५ जवान शहीद झाले आहेत. चकमक अजूनही सुरू आहे.
Loading...
Loading...
Loading...