Jammu Kashmir: एनआयएला मोठे यश; नॉर्कोटिक्स टेररिझम मॉड्यूलचा मुख्य ऑपरेटरला ठोकल्या बेड्या

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात (Kupwara Distict) एनआयएला (NIA) मोठं यश मिळालं आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) द्वारे चालवल्या जाणाऱ्या नार्कोटिक्स-टेररिझम मॉड्यूलच्या (Narcotics-Terrorism Module) प्रमुख ऑपरेटरला एनआयएने अटक केली आहे. दरम्यान, या कारवाई प्रकरणी फेडरल एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक करण्यात आलेला आरोपीचे नाव अब्दुल रौफ बदन (वय 45)आहे. हा तंगधरमधील कर्नाहच्या अमरोही गावचा रहिवासी आहे,

NIA Arrests Key Operator of Narcotics Terrorism Module
नॉर्कोटिक्स टेररिझम मॉड्यूलचा मुख्य ऑपरेटरला एनआयएकडून अटक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) द्वारे नार्कोटिक्स-टेररिझम मॉड्यूल चालवलं जात होतं.
  • अटक करण्यात आलेला आरोपीचे नाव अब्दुल रौफ बदन आहे.

Jammu Kashmir News: काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात (Kupwara Distict) एनआयएला (NIA) मोठं यश मिळालं आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) द्वारे चालवल्या जाणाऱ्या नार्कोटिक्स-टेररिझम मॉड्यूलच्या (Narcotics-Terrorism Module) प्रमुख ऑपरेटरला एनआयएने अटक केली आहे. दरम्यान, या कारवाई प्रकरणी फेडरल एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक करण्यात आलेला आरोपीचे नाव अब्दुल रौफ बदन (वय 45)आहे. हा तंगधरमधील कर्नाहच्या अमरोही गावचा रहिवासी आहे, हा 2020 मध्ये झालेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला 12वा आरोपी आहे. (Big success for NIA; Key operator of Narcotics Terrorism Module is arrested )

एजन्सीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अमरोही येथील नियंत्रण रेषेवरून (LOC) भाजीपाल्यांनी भरलेल्या वाहनांमध्ये लपून अमली पदार्थ, रोख रक्कम, शस्त्रे आणि दारूगोळा पुरवल्याबद्दल बदनला अटक करण्यात आली होती. तो लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलचा मुख्य ऑपरेटर आहे, जो पाकिस्तानी मास्टर्सच्या इशाऱ्यावर काम करत होता.  एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक करण्यात आलेला अब्दुल रौफ बदन हा तंगधर आणि नियंत्रण रेषेजवळील इतर ठिकाणी पाकिस्तानी हँडलर्सकडून अंमली पदार्थांची खेप गोळा करत असे आणि संबंधित इतर आरोपींना अंमली पदार्थ पुरवत असायचा.

या प्रकरणी सुरुवातीला 11 जून 2020 रोजी कुपवाडा येथील हंदवाडा पोलीस ठाण्यात सुरुवातीला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच वर्षी 23 जून रोजी एनआयएने त्याची पुन्हा नोंद केली होती. या प्रकरणातील 11 आरोपींविरुद्ध एजन्सीने यापूर्वीच जम्मू येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Read Also : हरतालिका तीजचे व्रत करताना चुका केल्यास नाही मिळणार फळ

अमली पदार्थ घेऊन घुसखोरीचा प्रयत्न 

काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. सैन्य दलाचे जवान आणि बारामुल्ला पोलिसांनी घुसखोरी करणाऱ्या दहशथवाद्यांचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. तसेच गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत, सीमेपलीकडून होणारी अमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेला.

Read Also : रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा 

यावेळी तस्करी करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर शोध मोहिमेत  बीएसएफ अधिकाऱ्यांना संशयिताच्या पिशवीतून आठ पाकिटांमध्ये ठेवलेले आठ किलोग्राम अमली पदार्थ जप्त केले. यावेळी हा जखमी घुसखोर पाकिस्तानच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी