Jammu Kashmir Encounter : जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत उडाली चकमक; एक दहशतवादी ठार, दोन जवान जखमी

कश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांचा खात्मा सुरू आहे. शनिवारी बारामुला भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. परंतु या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.

jammu kashmir encounter
जम्मू कश्मीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शनिवारी बारामुला भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.
  • या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
  • परंतु या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.

श्रीनगरः  कश्मीर खोर्‍यात (Kashmir Valley) दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा सुरू आहे. शनिवारी बारामुला (Baramula District) भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (encounter)  उडाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा (terrorist killed) करण्यात सुरक्षा दलाला यश आले परंतु. या चकमकीत दोन जवान जखमी (two soldier injured) झाले आहेत.

अधिक वाचा : Gujarat: गुजरातच्या भाजप सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप

मृत दहशतवाद्याचे नाव इरशाद अहमद असून तो बारामूला येथील पट्टनचा रहिवासी होता. इरशाद दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाशी निगडीत होता. मे २०२२ पासून तो सक्रिय झाला आणि अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. सुरक्षा दलाला त्याच्याकडून एक एके ४७ रायफल, मॅगेझीन आणि ३० राऊंड गोळ्या आढळल्या आहेत.

जम्मू कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना बारामुला जिल्ह्यात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा पोलीस आणि सैन्याने या भागात शोधमोहीम हाती घेतली. तेव्ह लपून बसलेल्या काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला आणि चकमक उडाली. सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर दहशवाद्यांच्या गोळीबारात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.

भारतीय सैन्य राष्ट्रीय रायफल, जम्मू कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ही कारवाई केली. ज्या भागात चकमक उडाली त्या भागात एक जुनी मश्जिद होती. या मशीदीला गोळी लागू नये म्हणून बुलेटप्रूफ गाडीने ही मशीद कवर करण्यात आली होती. यापूर्वी बुधवारी कुलगाम जिल्ह्यात अशाच प्रकारे चकमक उडाली होती. तेव्हा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला होता तसेच दशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

अधिक वाचा : Karnataka मध्ये चाललयं तरी काय ?, प्रवीणनंतर फाजिल, मंगळुरूचे शाळा-कॉलेज बंद...

यापूर्वी ६ जुलै रोजी कुलगाम जिल्ह्यातील हादीगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना चारही बाजूने घेरले होते आणि दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ दहशतवाद्यांनी आपल्या आई वडिलांच्या विनंतीवरून पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

अधिक वाचा : Flood: 'या' आखाती देशात पूर, पावसानं मोडला 27 वर्षांचा रेकॉर्ड; 870 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी