Jammu Kashmir: श्रीनगर : जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना श्रीनगरच्या घरात नजरकैद करण्यात आले आहे. ट्विटरवर मुफ्ती यांनी याचे फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. ट्विटरवर मुफ्ती म्हणाल्या की सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचे प्रशासनाने सांगितले आहे, परंतु सुरक्षा दल कश्मीर खोर्यात कुठेही जाऊ शकतात असेही मुफ्ती म्हणाल्या. (jammu kashmir ex chief minister mehbooba mufti house arrest in jammu kashmir)
मेहबूबा मुफ्ती यांनी आपला गुपकर भागातील घराच्या बाहेर सीआरपीएफची गाडी उभी असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. आपण सुनील कुमार भट यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार होतो परंतु प्रशासनाने त्यात आडकाठी आणली असा आरोप मुफ्ती यांनी केला आहे. शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी कश्मीरी पंडित सुनील कुमार भट यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेत त्यांचा भाऊ पिंटू कुमार जखमी झाले होते.
अधिक वाचा : Manish Sisodia यांच्यावर अटकेची तलवार, जाणून घ्या काय असते Lookout नोटीस
GOI wants to push the plight of Kashmiri pandits under the rug because its their callous policies that’ve led to unfortunate targeted killings of those who chose not to flee. Projecting us mainstream as their enemy is why Ive been placed under house arrest today. pic.twitter.com/GliRJaJX45 — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 21, 2022
अधिक वाचा : Hemant Soren : झारखंडचे सोरेन सरकार संकटात? ११ आमदार बैठकीला अनुपस्थित
कश्मीर खोर्यात कश्मीरी पंडितांची हत्या असल्याने यासाठी मुफ्ती यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या धोरणं कारणीभूत असल्याचे म्हटले होते. मुफ्ती म्हणाल्या की ज्या कश्मीरी पंडितांनी पळ नाही काढला त्यांना लक्ष्य करून ठार केले जात आहे, तसेच आम्हाला मुख्य खलनायक ठरवले जात असून आता मला नजरकैदेत ठेवले आहे असेही मुफ्ती म्हणाल्या.
अधिक वाचा : Monsoon Update: मुसळधार पावसाचा कहर, पूर आणि भूस्खलनात 31 जणांचा मृत्यू; अनेक बेपत्ता