Gallantry Awards : म्हणून जम्मू कश्मीर पोलिसांना सर्वाधिक शौर्य पुरस्कार, गृहमंत्री अमित शहांनी केला खुलासा

Gallantry Awards प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने विविध केंद्र आणि राज्य पोलीस दलाच्या जवानांना ९३९ सेवा पदकांनी गौरव केला. यात १८९ शौर्य पदकांचा समावेश आहे. १८९ पदकांपैकी ११५ पदक हे जम्मू कश्मीर पोलिसांना देण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक पदक हे जम्मू कश्मीर पोलिसांना मिळाले आहेत.

थोडं पण कामाचं
  • प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने विविध केंद्र आणि राज्य पोलीस दलाच्या जवानांना ९३९ सेवा पदकांनी गौरव केला.
  • यात १८९ शौर्य पदकांचा समावेश आहे.
  • १८९ पदकांपैकी ११५ पदक हे जम्मू कश्मीर पोलिसांना देण्यात आले आहेत.

Gallantry Awards : नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने विविध केंद्र आणि राज्य पोलीस दलाच्या जवानांना ९३९ सेवा पदकांनी गौरव केला. यात १८९ शौर्य पदकांचा समावेह्स आहे. १८९ पदकांपैकी ११५ पदक हे जम्मू कश्मीर पोलिसांना देण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक पदक हे जम्मू कश्मीर पोलिसांना मिळाले आहेत. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जम्मू कश्मीर पोलीस दहशतवादाविरोधातील लढ्यात भारताचे नेतृत्व करत आहे. संपूर्ण देशासाठी ही अभिमानास्पद आहे. जम्मू कश्मीर पोलिसांना प्रजासत्ताक दिनी ११५ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यासाठी अमित शहा यांनी जम्मू कश्मीर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे. 


दहशतवादी विरोधी अभियानात शहीद झालेले जम्मू कश्मीरचे पोलीस अधिकारी बाबू राम यांचा प्रजासत्ताक दिनी भारताचा सर्वोच्च शांतीकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बाबू राम यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीने हा पुरस्कार स्विकारला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक बाबू राम यांचा २९ ऑगस्ट २०२० रोजी श्रीनगरमध्ये एका चकमकमीत गोळी लागून मृत्यू झाला. तीन दहशतवाद्यांनी पोलीस आणि जवानांच्या संयुक्त दलावर गोळीबार केला. तेव्हा पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली या चकमकीत गोळी लागून बाबू राम हे शहीद झाले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी