Jammu and Kashmir: जवानांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल, बस नदीत कोसळून 6 जवान शहीद; 30 जखमी

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 16, 2022 | 13:58 IST

Accident in J&K:जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे (Pahalgam) मंगळवारी बस खोल दरीत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात सहा इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (Indo-Tibetan Border Police, आयटीबीपी) जवान शहीद झाले आहेत.

ITBP personnel Bus Accident in J&K:
जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे (Pahalgam) मंगळवारी बस खोल दरीत कोसळली आहे.
  • या अपघातात सहा इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (Indo-Tibetan Border Police, आयटीबीपी) जवान शहीद झाले आहेत.
  • जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगर (Srinagar) येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

श्रीनगर: Six ITBP personnel killed in Kashmir: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे (Pahalgam) मंगळवारी बस खोल दरीत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात सहा इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (Indo-Tibetan Border Police, आयटीबीपी) जवान शहीद झाले आहेत. तर 33 जण जखमी झालेत.

जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगर (Srinagar) येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरनाथ यात्रा ड्युटी संपवून आयटीबीपीचे जवान परत येत असताना हा अपघात झाला आहे.

अधिक वाचा- 'भाग्य दिले तू मला' मध्ये मंगळागौरी कार्यक्रमात येणार मोठा ट्विस्ट,अन् बघायला विसरू नका कावेरीचा स्पेशल डान्स 

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्यामुळे बसचा अपघात झाला आणि ती रस्त्यावरून घसरून नदीच्या काठावर पडली. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी माहिती दिली आहे की, बसमध्ये एकूण 39 जवान होते, त्यापैकी 37 आयटीबीपीचे होते आणि 2 जम्मू-काश्मीर पोलीस होते. बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीत पडली. सैनिक चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. 

ITBP कमांडो घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) हेलिकॉप्टर मृतांना घेऊन जाण्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. 10 जवान गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात इतर जवानही जखमी झाले आहेत.  

दरम्यान, उधमपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एक मिनी बस रस्त्यावरून घसरून दरीत पडली, त्यात 18 जण जखमी झाले होते. यावेळी बसमध्ये बहुतांश प्रवासी विद्यार्थी होते.

ही मिनी बस बारमीन येथून उधमपूरच्या दिशेने जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि घोर्डी गावाजवळ बस दरीत कोसळली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी