जम्मू काश्मीर: 'लष्कर-ए-तोयबा'च्या ३ दहशतवाद्यांना अटक

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांना मोठे यश मिळाले. पोलीस आणि सुरक्षा पथकांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

Jammu Kashmir Police arrested 3 LeT terrorists involved in Krishna Dhaba attack within 48 hrs
जम्मू काश्मीर: 'लष्कर-ए-तोयबा'च्या ३ दहशतवाद्यांना अटक 

थोडं पण कामाचं

  • जम्मू काश्मीर: 'लष्कर-ए-तोयबा'च्या ३ दहशतवाद्यांना अटक
  • कृष्णा ढाब्यावर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ४८ तासांत अटक
  • दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि हल्ल्यासाठी वापरलेली मोटरसायकल जप्त

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांना मोठे यश मिळाले. पोलीस आणि सुरक्षा पथकांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. पकडलेल्या दहशतवाद्यांनी बुधवारी दुर्गनाग भागातील कृष्णा ढाबा येथे हल्ला केला होता. गोळीबार करुन पळून गेलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना हल्ल्याच्या घटनेपासून ४८ तासांच्या आत अटक करण्यात आली. (Jammu Kashmir Police arrested 3 LeT terrorists involved in Krishna Dhaba attack within 48 hrs)

अटक केलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तान पुरस्कृत 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये घातपात करुन कायदा सुव्यवस्था बिघडवणे या हेतूने ते प्रयत्न करत होते. पण सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. 

परदेशांमधून आलेल्या प्रतिनिधींचे पथक जम्मू काश्मीरमध्ये असताना दहशतवाद्यांनी कृष्णा ढाबा येथे हल्ला केला होता. ढाब्यावर जाऊन दहशतवाद्यांनी आकाश मेहरा यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात जखमी झालेल्या आकाश मेहरा यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गोळीबार करुन दहशतवादी घटनास्थळावरुन वेगाने पळून गेले होते.

कृष्णा ढाबा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. श्रीनगरच्या पॉश भागात असलेल्या या ढाब्यापासून २०० मीटरच्या अंतरावर भारत आणि पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांच्या सैन्य पर्यवेक्षक समुहाचे कार्यालय (UNITED NATIONS MILITARY OBSERVER GROUP IN INDIA AND PAKISTAN - UNMOGIP / यूएनएमओजीआयपी) आणि जम्मू काश्मीरच्या मुख्य न्यायाधीशांचे निवासस्थान आहे.

कृष्णा ढाबा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी पकडलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. सुहैल अहमद मीर, ओवैस मंजूर सोफी आणि अजीज मीर अशी पकडलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तान पुरस्कृत 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. हल्ल्याच्या आधीपासून हे दहशतवादी 'लष्कर-ए-तोयबा'च्या संपर्कात होते. मूळचे जम्मू काश्मीरचे रहिवासी असलेल्या या दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. 

जम्मू काश्मीर शांतता नांदू नये यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरुन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना वारंवार जम्मू काश्मीरमध्ये घातपात करण्याचा प्रयत्न करत आहेत. कृष्णा ढाबा येथे बुधवारी १७ फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला हा दहशत निर्माण करण्याच्या हेतूनेच झाला होता. पण सुरक्षा पथकांनी ४८ तासांत हल्लेखोर दहशतवाद्यांना अटक केले आणि पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला. 

अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून पिस्तुल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले. कृष्णा ढाबा हल्ल्यासाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यातही पोलीस आणि सुरक्षा पथक यांना यश आले. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

याआधी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले. अधूनमधून दहशतवादी हल्ले होत आहेत. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ले थोपवण्यासाठी सुरक्षा पथके कार्यरत आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. यूपीए सरकारच्या काळात शिक्षणसंस्था जाळणे, पोलीस आणि सुरक्षा पथकांवर दगडफेक करणे हे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू होते. पण मागील अनेक महिन्यांत शिक्षणसंस्था जाळणे, पोलीस आणि सुरक्षा पथकांवर दगडफेक करणे हे प्रकार झालेले नाहीत; अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी