देशभरात हाय अलर्ट जारी, २० दहशतवाद्यांची घुसखोरी

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 10, 2018 | 15:08 IST | पूजा विचारे

जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून दहशतवादी मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. घाटीमध्ये मोठ्या संख्येनं दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती जवानांना मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

security forces
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: ANI

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. सुरक्षा एजन्सीला मिळालेल्या माहितीनुसार, घाटीमध्ये सुरक्षा नियंत्रण सीमारेषा (एलओसी) पार करून मोठ्या संख्येने दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. यामाहितीच्या आधारावर जम्मू-काश्मिरमध्ये जवानांनी हाय अलर्ट जारी केले असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. 

पुढच्या २ ते ३ दिवसात पाकिस्तानी दहशतवादी सरकारी किंवा आर्मी कार्यालयाला निशाणा बनवण्याची शक्यता आहे. तसेच घुसखोरी करून आलेले दहशतवादी हिट एन्ड रनसारखा हल्ला घडवण्याची शक्यता असल्याची माहिती जवानांनी दिली. 

दहशतवाद्यांकडून गोळीबार 

दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला. पुलवामाच्या ईदगाह भागात जाणारी CRPF ची १८३ वी बटालियनच्या बंकरवर गोळीबार करण्यात आला. सुदैवानं या गोळीबारात जीवितहानी टळली आहे. घटनेनंतर तात्काळ CRPFने सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी सर्च ऑपरेशनदरम्यान जवानांनी तीन बॅग हस्तगत केल्या. त्यात आयईडी ब्लास्टच्या संबंधित वस्तू असल्याची शक्यता आहे. 

 

अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानने व्यापलेल्या कश्मीर(पीओके) मधून राज्यात २० हून अधिक दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.  मौलाना मसूद अझहर नेतृत्त्व करत असलेली जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी दहशतवाद्यांचे कनेक्शन आहे. या पार्श्वभूमीवर जवानांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या असून संपूर्ण राज्यावर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

शस्त्रसंधी उल्लंघनाला केंद्र सरकारचा विरोध

केंद्र सरकारने रमजानच्या महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यावर घोषणा केली होती. मात्र दहशतवाद्यांवर याचा काही परिणाम दिसून आला  नाही. त्यानंतर दहशतवाद्यांनी घुसखोरी आणि हल्ले सुरूच ठेवले. दरम्यान काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी पुलवामा आणि शोपियां भागात ग्रेनेडचे हल्ले केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी