जम्मू काश्मीरमध्ये शाळा-कॉलेज सुरू, काही ठिकाणी पुन्हा निर्बंध 

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये  स्थिती हळूहळू सामान्य होत आहे. सोमवारी शाळा आणि कॉलेज सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकाणी पुन्हा निर्बंध घालण्यात आलेत.

Jammu And Kashmir
जम्मू काश्मीरमध्ये शाळा-कॉलेज सुरू, काही ठिकाणी पुन्हा निर्बंध   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा शाळा कॉलेज सुरू
  • पुन्हा एकदा इंटरनेट आणि मोबाइल सेवेवर बंदी
  • राज्यात गेल्या १५ दिवसांपासून होते निर्बंध

श्रीनगर:  जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर राज्यातली स्थिती आता हळूहळू पटरीवर येताना दिसत आहे. सोमवारी शाळा कॉलेज आणि सरकारी कार्यालय सुरू करण्यात आली. श्रीनगरमध्ये काही प्रायमरी शाळा उघडण्यात आली आहे. सोमवारी शैक्षणिक संस्था सुरू करण्याचे काम केवळ प्राथमिक शाळांकडून सुरू आहे. शाळा कॉलेज व्यतिरिक्त खोऱ्यात सरकारी कार्यालय पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. 

गेल्या १५ दिवसांपासून खोऱ्यात शाळा कॉलेज आणि सरकारी कार्यालय बंद ठेवणयात आले होते. सुरक्षेच्या कारणामुळे शाळा आणि कॉलेज बंद होते. रविवारी खोऱ्या १० आणि टेलिफोन एक्सचेंज पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान त्याआधी सुरू करण्यात आलेल्या १७ टेलिफोन एक्सचेंजची सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जम्मूमध्ये काही जागांवर 2G इंटरनेट सेवा देखील बंद केली. इंटरनेट शनिवारी जम्मूच्या पाच जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. 

जम्मूच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा इंटरनेट सेवा बंद 

शनिवारी संध्याकाळी अनेक ठिकाणी युवक आणि सुरक्षा जवान यांच्यामध्ये चमकमक झाल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले. याआधी काही ठिकाणांहून निर्बंध उठवण्यात आले होते. पण शनिवारी हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे ते पुन्हा लागू केलं गेलं. खोऱ्यात सुमारे १२ ठिकाणी निदर्शकांकडून आंदोलनं करण्यात आली. सरकारी प्रवक्ते रोहित कन्सल यांनी सांगितलं की, काश्मीरमध्ये शनिवारी संध्याकाळी सहा ठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली. त्यात आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

अफवा रोखण्यासाठी मोबाइल आणि इंटरनेट नाही 

राज्यात तसंच जम्मूत पसरवल्या जात असलेल्या अफवा थांबवण्यासाठी रविवारी पुन्हा पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा इंटरनेट आणि मोबाइलची सेवा बंद केली गेली. शनिवारीच ही सेवा सुरू करण्यात आली होती. शनिवारी रात्रीच जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये 2G नेटवर्क सुरू करण्यात आलं होतं.

सरकारनं जम्मू काश्मीरमधील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. कलम ३७० हटवण्याच्या दृष्टीनं हे निर्बंध घालण्यात आले होते. ज्यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला आहे. एएनआयनं जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव बी. व्ही.आर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं होतं की, परिसरातून पद्धतशीर बंदी  हटवण्यात येईल. पुढच्या काही दिवसांत निर्बंध आणखी शिथील केले जातील. 

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यासोबतच जम्मू-काश्मीर आणि लडाख असं दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा निर्णयही मोदी सरकारने घेतला. मोदी सरकारने ठेवलेला हा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात आला आणि त्यानंतर तो दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. जम्मू-काश्मीर विभाजनाचा प्रस्ताव संसदेत ठेवण्याच्या एक दिवसआधी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी जम्मूमधील मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...