जपान : पॅसेंजर ट्रेनमध्ये तरुणाचा 17 जणांवर चाकू हल्ला, नंतर पेटवला रेल्वेचा डबा; आनंदी दिसणाऱ्या महिला होत्या हिट लिस्टवर

Young man stabbed 17 people in a passenger train : जपान (Japan) मधील टोकियो (Tokyo) मध्ये रविवारी एका व्यक्तीने पॅसेंजर ट्रेनच्या (Passenger Train) डब्यातील प्रवाशी लोकांवर चाकूने हल्ला केला.

Japan Young man stabs 17 people in Tokyo train
जपान : पॅसेंजर ट्रेनमध्ये तरुणाचा 17 जणांवर चाकू हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हल्लेखोराचे वय हे फक्त 20 वर्ष
  • प्रवाशांवर हल्ला केल्यानंतर माथेफिरुने नंतर ट्रेनच्या डब्याला (Train coach ) आग (Fire) लावली.
  • हल्लेखोराला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की त्याला आनंदी दिसणाऱ्या महिलांवर चाकू हल्ला करायचा होता.

Young man stabbed 17 people in a passenger train : टोक्यो:  जपान (Japan) मधील टोकियो (Tokyo) मध्ये रविवारी एका व्यक्तीने पॅसेंजर ट्रेनच्या (Passenger Train) डब्यातील प्रवाशी लोकांवर चाकूने हल्ला केला. प्रवाशांवर हल्ला केल्यानंतर माथेफिरुने नंतर ट्रेनच्या डब्याला (Train coach ) आग (Fire) लावली. टोकियो अग्निशमन विभागाने सांगितले की, या घटनेत किमान 17 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. याविषयीये वृत्त NHK टेलिव्हिजनने दिले आहे की, हल्लेखोराला घटनास्थळीच अटक करण्यात आली आहे. हल्लेखोराचे वय हे फक्त  20 वर्ष असल्याचं सांगितले आहे.  हल्लेखोराला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की त्याला आनंदी दिसणाऱ्या महिलांवर चाकू हल्ला करायचा होता. 

टोकियो पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कोकुरियो स्टेशनजवळील केयो ट्रेनमध्ये घडली. हल्लेखोराने हा हल्ला का केला याची माहिती अद्याप समजू शकले नाही.  टेलिव्हिजन फुटेजमध्ये अनेक अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि पॅरामेडिकल कर्मचारी प्रवाशांना एस्कॉर्ट करत असल्याचे दिसून आले. अनेकांनी ट्रेनच्या खिडकीतून उडी मारली आणि पळ काढला. एका व्हिडिओमध्ये, प्रवासी दुसऱ्या डब्यात पळताना दिसत आहेत, आगीच्या ज्वाला वाढलेल्या दिसत आहेत. 

NHK ने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने प्रवाशांना भोसकल्यानंतर आणि आग लावली. आगीने जोर पकडावा यासाठी त्यात तेलासारखे द्रव ओतले. व्हिडिओ बनवणारे शुनसुके किमुराने NHK ला सांगितले की त्यांनी प्रवासी पळताना पाहिले आणि त्यांनी काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्फोट ऐकू आला आणि धूर निघताना दिसला.  टोकियोमध्ये दोन महिन्यांत ट्रेनमध्ये चाकू हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाच्या एक दिवस आधी एका ३६ वर्षीय व्यक्तीने पॅसेंजर ट्रेनमध्ये १० जणांवर चाकूहल्ला केला होता.  संशयिताने नंतर पोलिसांना सांगितले की, त्याला आनंदी दिसणाऱ्या महिलेवर हल्ला करायचा होता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी