Japanese PM Kishida safe after smok bomb at speech venue, suspect arrested : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर एक गॅस बॉम्ब फेकण्यात आला. या बॉम्बचा स्फोट होताच मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. पण अंगरक्षकांनी (बॉडीगार्ड) फुमियो किशिदा यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आता सुरक्षित आणि सुखरूप आहेत. सुरक्षा पथकाने बॉम्ब फेकणाऱ्याला अटक केली आहे. ही घटना जपानच्या पश्चिमेकडील भागातल्या वाकायामा येथे बंदर (पोर्ट) परिसरात घडली.
एक मोठा आवाज झाला. या आवाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. आवाज ऐकू येताच अंगरक्षकांनी (बॉडीगार्ड) फुमियो किशिदा यांना घेराव घातला आणि त्यांच्याभोवती सुरक्षा कडे केले. यानंतर अंगरक्षकांनी (बॉडीगार्ड) फुमियो किशिदा यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेले.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा वाकायामा येथे बंदर (पोर्ट) परिसरात दौऱ्यावर होते. पंतप्रधान नंतर एक सार्वजनिक सभा घेणार होते. पण बंदर (पोर्ट) परिसरात असतानाच पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर बॉम्ब फेकून हल्ल्याचा प्रयत्न झाला.
फेकण्यात आलेला बॉम्ब हा पाईप बॉम्ब प्रकारातील गॅस बॉम्ब होता. बॉम्ब जमिनीवर पडला त्यावेळी बॉम्बमधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. पण पण पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेने तातडीने हालचाली केल्या. यामुळे पंतप्रधानांना काहीही झालेले नाही ते सुरक्षित आणि सुखरुप आहेत.
14 देशांचा जावई, 105 वेळा केले लग्न
याआधी मागच्या वर्षी जुलै 2022 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नारा नावाच्या पश्चिम जपानमधील शहरात हत्या करण्यात आली. सुरक्षा यंत्रणेने मारेकऱ्याला शस्त्रासह अटक केली. तेत्सुया यामागामी (४१ वर्षे, राहणारा : नारा) असे मारेकऱ्याचे नाव आहे, त्याने हत्येची कबुली दिली. या घटनेला एक वर्ष होण्याच्या आत जपानच्या सध्या कार्यरत असलेल्या पंतप्रधानांवर बॉम्बद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झाला. यामुळे जपानमधील सुरक्षा यंत्रणा वाकायामातील घटनेचा अतिशय गांभिर्याने तपास करत आहे. सर्व शक्यता तपासून बघण्याचे काम सुरू आहे.
मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर