Jawad Cyclone PM Meeting : चक्रीवादळ जवादविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली बैठक, तयारीचा घेतला आढावा

Jawad Cyclone :  : बंगालच्या खोऱ्यात चक्रीवादळ (Cyclone) जवाद (Jawad)पासून बचाव होण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी एक उच्च स्तरीय बैठक (High level meeting) घेतल्याची माहिती अधिकृत सुत्राांनी दिली आहे.  

 Prime Minister Narendra Modi held a meeting on Hurricane Jawad
जवाद चक्रीवादळासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली बैठक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली
  • या बैठकीत कॅबिनेट सचिव राजीव गौबा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सहभागी होते.
  • चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर परिणाम होण्याची शक्यता.

Jawad Cyclone :  नवी दिल्ली : बंगालच्या खोऱ्यात चक्रीवादळ (Cyclone) जवाद (Jawad)पासून बचाव होण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी एक उच्च स्तरीय बैठक (High level meeting) घेतल्याची माहिती अधिकृत सुत्राांनी दिली आहे.  

या बैठकीत कॅबिनेट सचिव राजीव गौबा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत चक्रीवादळाची सद्यस्थिती आणि त्याचा संभाव्य परिणाम याविषयीची माहिती सादरीकरणाद्वारे पंतप्रधानांना देण्यात आली. या चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की शनिवारी सकाळी चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या भागात पोहोचण्याची शक्यता आहे.

ओडिशा सरकारने राज्यातील 13 जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना किनारी भागातील लोकांना बाहेर काढण्यास आणि मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.दरम्यान, या हवामान बदलामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्य सतंतधार पाऊस होत आहे. हवामान विभागाच्यामते, महाराष्ट्राच्या मुंबई-पुणे आणि कोकण भागात उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी