कोरोनामुळे जेइइ मेन परीक्षा पुढे ढकलली

JEE (Main) 2021 April session postponed as Covid19 cases see record spike देशातील वाढत्या कोरोना संकटामुळे जेइइ मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

JEE (Main) 2021 April session postponed as Covid19 cases see record spike
कोरोनामुळे जेइइ मेन परीक्षा पुढे ढकलली 

थोडं पण कामाचं

  • कोरोनामुळे जेइइ मेन परीक्षा पुढे ढकलली
  • कोरोना स्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल
  • तयारीसाठी विद्यार्थ्यांना किमान पंधरा दिवसांचा अवधी मिळेल याची खबरदारी घेणार

नवी दिल्ली: देशातील वाढत्या कोरोना संकटामुळे जेइइ मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही माहिती दिली. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल. तयारीसाठी विद्यार्थ्यांना किमान पंधरा दिवसांचा अवधी मिळेल याची खबरदारी घेऊन जेइइ मेन परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल. JEE (Main) 2021 April session postponed as Covid19 cases see record spike

याआधी अनेक शाळा कॉलेजांच्या परीक्षा रद्द झाल्या अथवा पुढे ढकलण्यात आल्या. पुढे ढकलेल्या परीक्षांबाबतचा निर्णय १ जून किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जाहीर करणार असल्याचे संबंधित परीक्षा घेणाऱ्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. प्रामुख्याने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या. विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभर केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन गुण देण्यात आले अथवा थेट पुढल्या इयत्तेत प्रवेश देण्यात आला. सीबीएसई बोर्ड तसेच काही राज्यांनी दहावीच्या परीक्षाही रद्द केल्या.

भारतात आतापर्यंत १ कोटी ४७ लाख ८८ हजार १०९ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी १ लाख ७७ हजार १६८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ कोटी २९ लाख ९ हजार ६४३ जण कोरोनामुक्त झाले. सध्या देशात १८ लाख १ हजार २९८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी