जेईई मेन २०२२ फायनल आन्सर की प्रसिद्ध, निकाल लवकरच

JEE Main 2022 Final answer key released, results soon on jeemain.nta.nic.in : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन २०२२च्या पहिल्या सेशनची आन्सर की प्रसिद्ध केली.

JEE Main 2022 Final answer key released, results soon on jeemain.nta.nic.in
जेईई मेन २०२२ फायनल आन्सर की प्रसिद्ध, निकाल लवकरच  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जेईई मेन २०२२ फायनल आन्सर की प्रसिद्ध
  • निकाल लवकरच जाहीर होार
  • अधिकृत वेबसाईटवर निकाल बघता येणार

JEE Main 2022 Final answer key released, results soon on jeemain.nta.nic.in : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन २०२२च्या पहिल्या सेशनची आन्सर की प्रसिद्ध केली. ही आन्सर की nat.nic.in आणि jeemain.nta.nic.in या दोन वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवार वेबसाईटवर आन्सर की बघू शकतील. ही फायनल आन्सर की आहे. लवकरच nat.nic.in आणि jeemain.nta.nic.in या दोन वेबसाईटवर जेईई मेन २०२२च्या पहिल्या सेशनचा निकाल जाहीर होणार आहे. 

उमेदवार सध्या आन्सर की बघून स्वतःला किती गुण मिळाले असतील याचा अंदाज बांधू शकतात. तसेच nat.nic.in आणि jeemain.nta.nic.in या दोन वेबसाईटवरून उमेदवार आन्सर की डाऊनलोड करून घेऊ शकतात.

जेईई मेन २०२२च्या पहिल्या सेशनची परीक्षा जून २०२२ मध्ये झाली होती. पहिला पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरा पेपर दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत झाला होता. 

जेईई मेन २०२२च्या दुसऱ्या सेशनचा पेपर देण्यासाठी रजिस्ट्रेशन करू इच्छिणाऱ्यांकरिता नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ही नोंदणी ९ जुलै २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवार जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर दुसऱ्या सेशनचा पेपर देण्यासाठी नोंदणी करू शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी