JEE Exam 2022 : नवी दिल्ली : २१ एप्रिल रोजी होणारी जॉइंट एंट्रेस परीक्षा पुढी ढकलण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेवरून वाद सुरू होता. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा एप्रिल महिन्यानंतर घ्यावी अशी मागणी केली होती. तसेच या परीक्षेसाठी २ ऐवजी ४ वेळा संधी देण्यात यावी अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. नॅशन टेस्टिंग एजन्सीने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली असून जेईई मेन परीक्षा २०२२ची तारीख पुढे ढकलली आहे.
JEE (Main)dates rescheduled to enable students across the country to prepare well for the exams. @dpradhanbjp @EduMinOfIndia pic.twitter.com/QYABHnd7SC
— National Testing Agency (@DG_NTA) April 6, 2022
एनटीने या आधी 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27,28 आणि 29 जून 2022 या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या तारखा पुढे ढकलून आता ही परीक्षा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, आणि 30 जुलै 2022 रोजी होणार आहे. जेईई परीक्षेची माहिती आणि तारीख जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर लॉग ऑन करण्याचे आवाहन केले आहे.
Application Process for NEET (UG) 2022 is now open. All the best. @EduMinOfIndia pic.twitter.com/fYibGc0JaB
— National Testing Agency (@DG_NTA) April 6, 2022
जेईईची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी #JEEStudentsWantJustice असा हॅश टॅगही ट्रेंड केला होता. एनटीएने जेईई मेनची परीक्षा 21 एप्रिल, 24, 25, 29 आणि1 मे, 4 मे आणि 24 ते 29 मे दरम्यान परीक्ष होती. या वेळी बोर्डाचीही परीक्षा होती. दोन्ही परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण येत होता. तसेच या परीक्षेसाथी दोन ऐवजी ४ संधी देण्यात यावी अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली होती.
NEET (UG) 2022 to be held in 14 cities outside India for the first time. @dpradhanbjp @EduMinOfIndia
— National Testing Agency (@DG_NTA) April 6, 2022