JEE Main 2022 : जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा २५ जूनपासून

JEE Main 2022 : 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (National Testing Agency - NTA) बुधवार २० जुलै २०२२ रोजी मोठी घोषणा केली.

JEE Main 2022 Second Session Postponed
JEE Main 2022 : जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा २५ जूनपासून  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • JEE Main 2022 : जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा २५ जूनपासून
  • आधी जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा गुरुवार २१ जुलै २०२२ पासून सुरू होणार होती
  • परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचे कारण एनटीएने जाहीर केलेले नाही

JEE Main 2022 : 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने (National Testing Agency - NTA) बुधवार २० जुलै २०२२ रोजी मोठी घोषणा केली. एनटीएने केलेल्या घोषणेनुसार जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा सोमवार २५ जुलै २०२२ पासून सुरू होणार आहे. आधी जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा गुरुवार २१ जुलै २०२२ पासून सुरू होणार होती. परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचे कारण एनटीएने जाहीर केलेले नाही. 

जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा भारताबाहेरच्या १७ शहरांसह देशातील ५०० शहरांमध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा ६.२९ लाख विद्यार्थी देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी jeemain.nta.nic.in वरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे. परीक्षेबाबतची अधिकृत माहिती याच वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी