JEE Main 2023 Notification : जेईई मेंसचे नोटिफिकेशन 'या' तारखेला जाहीर होणार

jee main 2023 notification pdf download from jeemain nta nic in check eligibility number of attempts : 'जेईई मेन'ची (Joint Entrance Examination - Main : JEE-Main / All India Engineering Entrance Examination) प्रतिक्षा करत असलेल्यांसाठी मोठी बातमी.

jee main 2023 notification pdf download from jeemain nta nic in check eligibility number of attempts
जेईई मेंसचे नोटिफिकेशन 'या' तारखेला जाहीर होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जेईई मेंसचे नोटिफिकेशन 'या' तारखेला जाहीर होणार
  • 'जेईई मेन'ची प्रतिक्षा करत असलेल्यांसाठी मोठी बातमी
  • दोन वेबसाईटवर जेईई मेन परीक्षेच्या तारखेची माहिती उपलब्ध

jee main 2023 notification pdf download from jeemain nta nic in check eligibility number of attempts : 'जेईई मेन'ची (Joint Entrance Examination - Main : JEE-Main / All India Engineering Entrance Examination) प्रतिक्षा करत असलेल्यांसाठी मोठी बातमी. लवकरच जेईई मेन परीक्षेची तारीख जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे. तारखेची घोषणा https://jeemain.nta.nic.in/ आणि https://nta.ac.in/ या दोन वेबसाईटवर जेईई मेन परीक्षेच्या तारखेची माहिती उपलब्ध होईल. जे जेईई मेन परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी या वेबसाईटवर येणाऱ्या माहितीकडे लक्ष ठेवावे. 

फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले अथवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेले अथवा पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले असे पात्र विद्यार्थीच जेईई मेन परीक्षा देऊ शकतील. 

प्रत्येकाला जास्तीत जास्त 3 वेळा जेईई मेन परीक्षा देण्याची संधी मिळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेईई मेन परीक्षेचे आयोजन मे 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या तारखांबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पण अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. 

JEE Main - NTA 2023 Notification अर्थात जेईई मेन परीक्षेबाबतची अधिसूचना शुक्रवार 16 डिसेंबर 2022 ते मंगळवार 20 डिसेंबर 2022 या कालावधीत होण्याची शक्यता आहे. 

जेईई मेन परीक्षेची अधिसूचना जारी झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पात्र विद्यार्थी जेईई मेन परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरू शकतील. जेईई मेन परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे बंधनकारक आहे. 

जेईई मेन परीक्षेचे अॅडमिट कार्ड हे परीक्षेच्या एक आठवडा आधी जाहीर होईल. याआधी 2022 मध्ये जेईई मेन परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षेआधी एक्झाम सिटी स्लिप जाहीर केली होती. या स्लिपमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नक्की कुठे जायचे आहे हे लक्षात आले आणि पुढील नियोजन करणे सोपे झाले होते. यंदाही हीच पद्धत वापरली जाण्याची शक्यता आहे. 

Bank Jobs: काय तुमचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालंय? काळजी नको तुम्हालाही मिळेल बँकेत नोकरी,आजच करा अर्ज

SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी