jee main 2023 notification released on official website jeemain.nta.nic.in , registration begins : इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशासाठी जॉइंट एंट्रंस एक्झाम 2023 (JEE Main) साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे. जॉइंट एंट्रंस एक्झाम 2023 अर्थात JEE मध्ये दोन पेपर असतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनेक प्रतिष्ठित सरकारी आणि खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहे. JEE अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसण्यासाठीही JEE उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
जेईई मेन अधिसूचना JEE Main 2023 Notification
जेईई मेन रजिस्ट्रेशन लिंक JEE Main 2023 Registration Link
जेईई मेन्स परीक्षा 2023 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परीक्षेचे पहिले सत्र (सेशन) जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरे सत्र (सेशन) एप्रिल 2023 मध्ये आहे.
SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर