JEE Main Toppers: जुळ्या भावंडांची कमाल, जेईई मेन परीक्षेत एकाने मिळवले 100 टक्के तर दुसऱ्याने 99.99 टक्के, वाचा काय आहे सीक्रेट

Jee Main 2023 Result toppers: जेईई मेन सेशन 1 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क्स मिळवले आहेत. तर निपूण आणि निकुंज या दोन जुळ्या भावंडांनीही कमाल करुन दाखवली आहे.

Jee Main 2023 result twins brother nipun goel score 100 percentile and nikunj goel score 99.99 percentile in exam read in marathi
JEE Main Toppers: जुळ्या भावंडांची कमाल, जेईई मेन परीक्षेत एकाने मिळवले 100 टक्के तर दुसऱ्याने 99.99 टक्के, वाचा काय आहे सीक्रेट 
थोडं पण कामाचं
  • जेईई मेन 2023 परीक्षेचा निकाल जाहीर
  • जेईई मेन 2023 च्या परीक्षेत 20 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 टक्के मार्क्स
  • निपूण आणि निकुंज या जुळ्या भावंडांनीही केली कमाल

JEE Main 2023 twins brother Nikunj and Nipun Goel score: जेईई मेन 2023 सेशन 1 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क्स मिळवले आहेत. तर जुळ्या भावंडांनी कमाल करुन दाखवली आहे. या जुळ्या भावंडांची नावे आहेत निपूण गोयल आणि निकुंज गोयल. या दोन्ही भावंडांपैकी एकाने 100 टक्के तर दुसऱ्या भावाने 99.99 टक्के मार्क्स मिळवले आहेत. या दोघांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जेईई मेन 2023 सेशन 1 परीक्षेत उत्तरप्रदेशातील जुळी भावंडे निपूण आणि निकुंज यांनी चांगले यश मिळवले आहे. या दोन्ही भावंडांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. उत्तरप्रदेशातील हापुड येथे राहणाऱ्या निपूण गोयल याने 100 टक्के मार्क्स तर निकुंज गोयल याने 99.99 टक्के मार्क्स मिळवले आहेत.

हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा तुमचा चेहरा बनवेल चमकदार

असे मिळवले घवघवीत यश

जेईई मेन सेशन 1 च्या टॉपर्सच्या लिस्टमध्ये आलेले निपूण आणि निकुंज यांनी दोन वर्षांपर्यंत जेईई परीक्षेची तयारी केली होती. या काळात दोघांनीही एकमेकांना खूप मदत केली. स्टडी शेड्युल्ड, प्रॅक्टिस आणि अभ्यास करण्याची एकूणच तयारी करण्याची पद्धत दोघांचीही एकसारखीच होती.

हे पण वाचा : Board Exam: बोर्डाच्या परीक्षेवेळी करू नका या चुका

निपूण आणि निकुंज यांनी सांगितले की, जेईई मेन 2023 ची तयारी त्यांनी 10वीत असतानाच सुरू केली होती. त्यांनी सांगितले की, कोविडचा काळ सुरू होता आणि ऑनलाईन क्लासेस सुरू होते. त्यामुळे ट्रॅव्हल करण्याची वेळ वाचत होती पण ऑफलाईन क्लास उत्तम असतात आणि त्यामुळेच जास्त मदत मिळते. त्यामुळेच हळूहळू अनलॉक झाल्यावर दोघांनीही मेरठ येथील एक कोचिंग क्लास जॉईन केला. इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना निपूण ने म्हटलं, गेल्या दोन वर्षांत आम्ही केवळ एकमेकांना साथ दिली नाही तर दोघांत एक स्पर्धा सुद्धा ठेवली. आमचं शेड्युल्ड, अभ्यासाची रणनिती सारखीच होती. जर एकाला काही अडचण येत असे तर दुसरा भाव मदतीला धावून त्याला मदत करत असे.

हे पण वाचा : या टिप्स वापरा अन् अभ्यास करताना मुलांना येणारी झोप पळवा

कोडिंगमध्ये भविष्य

निपूण आणि निकुंज यांना आता आयआयटी दिल्ली किंवा आयआयटी मुंबई येथे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागातून बीटेक करण्याची इच्छा आहे. दोन्ही भावंडांना 10वी पर्यंत कोडिंग करण्याची खूप इच्छा होती. मात्र, जेईई परीक्षेच्या तयारीसाठी दोन वर्षांपर्यंत दोघांनी कोडिंग पासून थोडे लांब राहण्याचा निर्णय घेतला. पण आता परीक्षा झाल्यावर दोघांचीही याच स्ट्रिममध्ये बीटेक करुन कोडिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी