JEE Main 2023 Toppers List: जेईई मेन परीक्षेत 20 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के मार्क्स, वाचा संपूर्ण यादी

JEE Main 2023 Toppers: जेईई मेन सेशन 1 मध्ये 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क्स मिळवले आहेत.

JEE Main 2023 Toppers List 20 students scored 100 percentile check complete list of toppers
JEE Main 2023 Toppers List: जेईई मेन परीक्षेत 20 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के मार्क्स, वाचा संपूर्ण यादी 
थोडं पण कामाचं
  • जेईई मेन 2023 रिजल्ट jeemain.nta.nic.in वर पाहू शकता
  • जेईई मेन परीक्षा 2023 मध्ये 20 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 टक्के मार्क्स

JEE Main 2023 result announced, check toppers list: जेईई मेन 2023 परीक्षेच्या सेशन-1 चा निकाल जाहीर झाला आहे. Jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत 20 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाईल मार्क्स (20 students scored 100th percentile in JEE Main Result) मिळाले आहेत. (JEE Main 2023 Toppers List 20 students scored 100 percentile check complete list of toppers)

या विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी हे एलेन इन्स्टिट्यूट कोटा मधील आहेत. यामध्ये कौशल विजयवर्गीय, देशांक प्रताप सिंह, हर्षुल संजय भाई, सोहम दास, दिव्यांश हेमेंद्र शिंदे आणि क्रिष गुप्ता या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हे पण वाचा : हे घरगुती उपाय करा अन् मानदुखीपासून आराम मिळवा

पाच प्रश्न ड्रॉप

जेईई मेन सेशन 1 मध्ये पाच प्रश्न वगळण्यात आले होते. यावर्षी 8.6 लाख उमेदवारांनी पेपर 1 आणि 0.46 लाख विद्यार्थ्यांनी पेपर 2 ची परीक्षा दिली होती. जेईई मेन पेपर 1 बीई / बीटेकची पहिली आणि दुसऱ्या टर्मची परीक्षा 24 जानेवारी, 25, 29, 30 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2023 मध्ये आजोयित करण्यात आली होती. पेपर 2 हा 28 जानेवारी रोजी झाला होता. जेईई मेन 2023 सेशन 1 आयोजित करण्यात आला होता.

हे पण वाचा : घशाची खवखव दूर करण्यासाठी घरगुती अन् रामबाण उपाय

How to Check JEE Main 2023 Session 1 Result

  1. जेईई मेन 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम jeemain.nta.nic.in ला भेट द्या
  2. या ठिकाणी तुम्हाला होम पेजवर रिजल्ट नोटिफिकेशन दिसेल
  3. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल
  4. यामध्ये विचारण्यात आलेली आवश्यक माहिती भरा
  5. ही सर्व माहिती अपलोड केल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा
  6. माहिती सबमिट करताच तुम्हाला रिजल्ट दिसेल
  7. हा रिजल्ट तुम्ही डाऊनलोड करु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी