JEE Main Result 2022: JEE मुख्य निकाल जाहीर, 'या' लिंकवर थेट तपासा; आणि करा Download

JEE Main Result 2022 Declared:संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) सत्र 1 जून 2022 चा निकाल 11 जुलै रोजी (मध्यरात्रीनंतर) घोषित करण्यात आला.

JEE Main Result 2022
JEE Main Result 2022 
थोडं पण कामाचं
 • JEE Main सत्र 1 जून 2022 चा निकाल 11 जुलै रोजी घोषित करण्यात आला.
 • जेईई निकाल 2022 तपासण्यासाठी तुम्ही येथे देण्यात स्टेप्स फॉलो करू शकता.
 • जेईई मुख्य निकाल 2022 - जेईई निकाल ऑनलाइन असा तपासा.

नवी दिल्ली: JEE Main Result 2022: संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) सत्र 1 जून 2022 चा निकाल 11 जुलै रोजी (मध्यरात्रीनंतर) घोषित करण्यात आला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर JEE मुख्य निकाल जाहीर केला आहे.  जेईई निकाल 2022 तपासण्यासाठी तुम्ही येथे देण्यात स्टेप्स फॉलो करू शकता. त्या स्टेप्सनुसार तुम्ही निकाल पाहू शकणार आहात. 

B.Arch, B.Planning, B.E आणि B.Tech सेशन 1 पेपरसाठी NTA द्वारे JEE मुख्य निकाल जाहीर करण्यात आला आहे. याआधी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सत्र 1 साठी JEE मेन फायनल आन्सर की जारी केली होती आणि  Final Answer Key आधी प्रोविजनल Answer Key जारी करण्यात आली होती, ज्या दरम्यान विद्यार्थ्यांना आक्षेप घेण्याची संधी देण्यात आली होती.

अधिक वाचा-  आषाढी एकादशीला मित्रांवर काळाचा घाला, नागपुरहून आलेल्या दोघांचा पंढरपुरात मृत्यू

जेईई मुख्य निकाल 2022 - जेईई निकाल ऑनलाइन असा तपासा

 • उमेदवार प्रथम अधिकृत वेबसाइट -jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
 • होमपेजवर, Candidate Activity  नावाचा बॉक्स चेक करा, येथे निकाल पाहण्यासाठी लिंक दिसेल.
 •  URL 1 : Download Score Card of JEE(Main) Session 1_Paper 1
 • URL 2 : Download Score Card of JEE(Main) Session 1_Paper 1
 • URL 3 : Download Score Card of JEE(Main) Session 1_Paper 1
 • आता क्रेडेन्शियल वापरा. जसे की नोंदणी आयडी, जन्मतारीख
 • JEE Main Result 2022 स्क्रीनवर दिसेल.
 • डाऊनलोड करण्यासोबतच त्याची प्रिंटआउटही घेता येईल.

जाणून घ्या पुढील प्रक्रिया 

जूनमध्ये सत्र 1 च्या परीक्षेला 7 लाखांहून अधिक विद्यार्थी बसल्याच अंदाज वर्तवण्यात आला होता. या उमेदवारांचा निकाल आता NTA ने जाहीर केला आहे. जेईई मेन 2022 परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आता जेईई अॅडव्हान्स 2022 परीक्षेत बसण्यास पात्र असणार आहेत. JEE Advanced 2022 चा अंतिम कट ऑफ JEE मेन 2022 साठी सत्र 2 परीक्षा संपल्यानंतर NTA द्वारे जारी केला जाईल.

सत्र 2 साठी नोंदणी

जेईई मेन 2022 सत्र 2 साठी नोंदणी सध्या सुरू आहे. नोंदणी jeemain.nta.nic.in वरून ऑनलाइन केली जाऊ शकते. NTA जुलै 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30, 2022 रोजी JEE मेन 2022 सत्र 2 परीक्षा घेणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी