जेईई-मेन्सचा निकाल जाहीर; 44 परीक्षार्थींना 100 टक्के गुण; महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये

राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (एनटीए) नं इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेन्सचा निकाल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आला. जाहीर केलेल्या निकालात एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.

JEE-Mains results announced
JEE Main Result : जेईई-मेन्सचा निकाल जाहीर  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • जेईई मेन पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालाच्या आधारावर टॉपचे 2 लाख 45 हजार विद्यार्थी हे JEE Advanced साठी पात्र झालेले आहेत.
  • 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाली आहे.
  • महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी टॉप रॅक 18 मध्ये आहे.

मुंबई : JEE Mains Result : राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (एनटीए) नं इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेन्सचा निकाल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आला. जाहीर केलेल्या निकालात एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाली आहे. शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री यासंदर्भात माहिती दिली. 

यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवली आहे. त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्र प्रदेशचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वनवर कर्नाटकचा गौरब दास आहे.

चार टप्प्यांत परीक्षेचे आयोजन 

यावर्षापासून संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळू शकेल. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता. पुढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये पार पडणार होत्या. परंतु, देशात कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. तिसरा टप्पा 20-25 जुलैपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तर चौथा टप्पा 26  ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता. 

कसा तपासाल आपला JEE Main Result 2021?

स्टेप 1- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा.
स्टेप 2- जेईई मेन 2021 च्या सेशन 4 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3- आता परीक्षेचं सेशन, अर्ज संख्या, जन्म तारीख नोंद करा.
स्टेप 4- JEE मेन 2021 च्या निकालाची कॉपी डाऊनलोड करा.

कोणत्या साईटवर निकाल चेक करु शकता?

nta.ac.in
ntaresults.nic.in
jeemain.nta.nic.in
कशी होती परिक्षा?
विशेष म्हणजे बीई/बिटेकसाठी JEE मेन पेपर 1 मध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आहेत तर पेपर 2 मध्ये गणित, अॅप्टीट्युड आणि ड्रॉईंग आहे. प्रश्न हे चार चार मार्क्ससाठी मल्टिपल चॉईस आणि न्यूमरीकलवर आधारीत होते.

JEE Advanced

यावर्षी 9.34 लाख उमेदवारांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 77 टक्के उमेदवारांनी डबल परिक्षा दिली. 60 टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांनी स्कोअर वाढवण्यासाठी तीन वेळा परिक्षा दिली. जेईई मेन पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालाच्या आधारावर टॉपचे 2 लाख 45 हजार विद्यार्थी हे JEE Advanced साठी पात्र झालेले आहेत.  ह्या एकमेव परिक्षेतूनच देशातल्या प्रमुख अशा 23 IITs(Indian Institutes of Technology ) प्रवेश मिळेल. जेईई अॅडव्हान्सची परिक्षा ही 3 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. जेईई मेन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच जेईई अॅडव्हॉन्ससाठी नोंदणी सुरू झाली आहे. टॉपचे 2 लाख 50 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हॉन्ससाठी पात्र आहेत. उमेदवार jeeadv.ac.in वर जाऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी