Hemant Soren : झारखंडचे सोरेन सरकार संकटात? ११ आमदार बैठकीला अनुपस्थित

झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलावलेल्या बैठकीला ११ आमदार अनुपस्थित होते, त्यामुळे झारखंडचे सरकार संकटात आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप येन केन प्रकारेन सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. परंतु भाजपचा हा प्रयत्न सफल होणार नाही असे सोरेन म्हणाले.

hemant soren
हेमंत सोरेन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलावलेल्या बैठकीला ११ आमदार अनुपस्थित होते
  • झारखंडचे सरकार संकटात आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
  • भाजप येन केन प्रकारेन सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे.

Hemant Soren : रांची : झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलावलेल्या बैठकीला ११ आमदार अनुपस्थित होते, त्यामुळे झारखंडचे सरकार संकटात आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप येन केन प्रकारेन सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. परंतु भाजपचा हा प्रयत्न सफल होणार नाही असे सोरेन म्हणाले. तसेच भाजप कशा प्रकारे राज्य सरकार पाडू पाहत आहे आणि केंद्र सरकार कशा प्रकारे राज्यांसोबत दुजाभाव करत आहे हे आपण जनतेला सांगणार असेही सोरेन म्हणाले. महागठबंधनच्या बैठकीला जे आमदार अनुपस्थित होते त्यात काँग्रेस आमदारांचाही समावेश आहे. (jharkhand 11 mla of congress and jmm absent in cm hemant soren meeting )

अधिक वाचा : Criminal Nurse : नर्सने रुग्णाचा घेतला गैरफायदा, नोकरी गमावून खातेय जेलची हवा

झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. त्यापैकी ३० जागांवर हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला ३५ जागांवर यश मिळाले होते. तर काँग्रेसने १६ जागा जिंकल्या होत्या. भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या. झारखंडमध्ये झारखंड मुक्ति मोर्चा आणि काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले होते आणि हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

अधिक वाचा : Rahul Gandhi: काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी राहुल गांधींचा नकारच! कुणाकडे येणार सूत्रं?

राज्यातील दुष्काळावर चर्चा

झारखंड राज्यात काही ठिकाणी दुष्काळ पडला होता. त्यावर या बैठकीच चर्चा झाली. सरकार कुठलाही भेदभाव न करता राज्याच्या जनतेला मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री सोरेन यांनी दिले. ज्या भागात दुष्कार पडला आहे त्यात पलामू, गढवा या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सोरेन या भागांचा दौरा करणार आहे. 

अधिक वाचा : Beaten for Fees : 250 रुपये फीसाठी शिक्षकाकडून अमानूष मारहाण, दलित विद्यार्थ्याचा मृत्यू, युपीतील घटनेने संताप

११ आमदार अनुपस्थित

शनिवारी महागठबंधन सरकारची बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हा काँग्रेस आणि झारखंड मुक्ति मोर्चाचे ११ आमदार या बैठकीला अनुपस्थित होते. त्यात काँग्रेसचे भूषण बाडा रांचीत हवामान बिघडल्यामुळे फ्लाईट न पोहोचल्यामुळे अनुपस्थित होते. पौर्णिमा सिंह या बाहेर होत्या म्हणून त्या बैठकीला आल्या नाहीत. ममता देवी यांची तब्येत ठीक नव्हती तसेच नेहा तिर्की दिल्लीत असल्याने त्या या बैठकीला आल्या नाहीत. तर दुसरीकडे झारखंड मुक्ति मोर्चाचे सरफराज अहमद परदेश दौर्‍यावर होते आणि चमरा लिंडा तब्येतीच्या कारणामुळे अनुपस्थित होत्या. समीर मोहंती हवामान बिघडल्यामुळे संध्याकाळी उशीरा पोहोचले. तर बसंत सोरे दिल्लीत असल्याने अनुपस्थित होते. तर काँग्रेसचे तीन आमदार कॅश घोटाळ्यात अटक असून कोलकात्यात जामिन प्रकियेत अडकल्याने अनुपस्थित होते.

अधिक वाचा : Railway Bridge: मुसळधार पावसाचा फटका; रेल्वे पूल कोसळला, पुरात वाहून गेला खांब, Watch Video

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी