मोठा अपघात, बस दरीत कोसळली, सहा प्रवाशांचा मृत्यू तर ३९ जखमी

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 25, 2019 | 10:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bus Fell into Gorge: बस दरीत कोसळून एक मोठा अपघात झाला आहे. झारखंडमधील गढवा जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ३९ प्रवासी जखमी झाले आहेत.

jharkhand bus accident gorge garhwa
बस दरीत कोसळून मोठा अपघात  |  फोटो सौजन्य: ANI

गढवा: झारखंडमधील गढवा येथे बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. ही बस छत्तीसगढहून झारखंडमधील गढवा येथे जात होती. मात्र, रस्त्यातच या बसला अपघात झाला. अन्नराज घाटात ही बस दरीत कोसळली आणि मोठा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक दाखल झालं. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ३९ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बसच्या खालीही अनेक प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बस दरीत कोसळून खाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. रात्रीच्या सुमारास बच चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कुल्लूमध्ये बस अपघात 

२० जून रोजी सुद्धा अशाच प्रकारचा एक भीषण अपघात झाला होता. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात झालेल्या अपघातात एक प्रवासी बस खोल दरीत कोसळली होती. ५०० फूट खोल दरीत बस कोसळून झालेल्या या अपघातात तब्बल तीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर चाळीस प्रवासी जखमी झाले होते. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.

कुल्लूमध्ये झालेल्या या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले होते. जखमींमध्ये १२ महिला, १० तरुण, ६ तरुणी आणि ७ मुलांचा समावेश होता. या अपघाता जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मोठा अपघात, बस दरीत कोसळली, सहा प्रवाशांचा मृत्यू तर ३९ जखमी Description: Bus Fell into Gorge: बस दरीत कोसळून एक मोठा अपघात झाला आहे. झारखंडमधील गढवा जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ३९ प्रवासी जखमी झाले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles