Jharkhand Accident : झारखंडमध्ये बस आणि गॅस सिलिंडरच्या ट्रकचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू

Jharkhand Accident झारखंडमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६ हून अधिक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

jharkhand accident
झारखंड अपघात  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • झारखंडमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात
  • या अपघातात ८ जणांचा मृत्यू
  • १६ हून अधिक जण गंभीर जखमी

Jharkhand Accident :रांची : झारखंडमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६ हून अधिक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात सिलिंडरने गॅसने भरलेल्या आणि प्रवासी बसचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १६ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाता १० जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर होते, सुदैवाने सिलिंडर्सचा स्फोट झाला नाही अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी